Post Office Scheme : प्रत्येकाला आपल्याकडील पैसा वाढावा असे वाटते. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी देखील गुंतवणूक केली जाते. तसेच काहीजण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवतात.
परतावा कमी मिळाला तरी चालेल मात्र पैशांची नुकसान व्हायला नको असे अनेकांचे म्हणणे असते. त्यामुळे जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याकाठी 9250 रुपयांचे फिक्स इन्कम मिळणार आहे.
या योजनेत तुम्हाला एकदाच रक्कम गुंतवावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज स्वरूपात एक फिक्स रक्कम दिली जाणार आहे.
कशी आहे मंथली इनकम स्कीम
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम म्हणजे MIS स्कीम गुंतवणूकदारांसाठी फारच फायदेशीर आहे. ही योजना पाच वर्षांसाठीची आहे. या योजनेत किमान एक हजार रुपये आणि कमाल 15 लाख रुपये गुंतवता येतात.
या योजनेत दोन प्रकारचे अकाउंट खोलले जाते. सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंट असे दोन प्रकार आहेत. सिंगल अकाउंट ओपन केल्याचं कमाल नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास कमाल 15 लाख रुपये गुंतवता येतात.
किमान एक हजार रुपयांपासून ते 1000 च्या पटीत ही रक्कम असायला हवी. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर सरकारकडून 7.4% या दराने व्याज दिले जाते.
या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर सरकारकडून हमी मिळते. जर समजा एखाद्याने या योजनेत पैसे गुंतवले आणि पाच वर्षांपूर्वीच पैसे काढले तर एक टक्के रक्कम कापून घेतली जाते.
9250 रुपये मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागणार
या योजनेत सिंगल अकाउंट ओपन केल्यास कमाल नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास कमाल 15 लाख रुपये गुंतवता येतात.
जर एखाद्याने जॉईंट अकाउंट ओपन केले आणि यामध्ये पंधरा लाख रुपये गुंतवले तर त्याला प्रत्येक महिन्याला 9250 रुपये एवढे व्याज मिळणार आहे.