गुंतवणूकदारांची चांदी ! पोस्टाच्या ‘या’ 5 बचत योजना देत आहेत FD पेक्षा अधिक व्याज

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. खरेतर भारतात फार पूर्वीपासून बँकेच्या एफडी योजनेत पैशांची गुंतवणूक केली जात आहे. आजही मोठ्या प्रमाणात नागरिक एफडी करण्याला प्राधान्य दाखवतात.

एफडीमध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने आणि गेल्या काही वर्षांपासून एफडीवर देखील चांगले व्याज मिळत असल्याने यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तथापि, पोस्ट ऑफिस अशा काही बचत योजना राबवत आहे ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना एफडी पेक्षा अधिकचे रिटर्न मिळणार आहेत.

दरम्यान आता आपण पोस्ट ऑफिसच्या कोणत्या बचत योजना एफडी पेक्षा अधिकचे व्याज देत आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुम्हीही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आधी कोणत्या योजना सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत याची माहिती जाणून घ्या.

या योजना देत आहेत सर्वाधिक व्याज

1) सीनियर सिटीजन सेविंग स्कीम : पोस्टाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. SCSS ही योजना पोस्टाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना ८.२० टक्के दराने व्याज मिळणार आहे. यात किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येणार आहे.

2) सुकन्या समृद्धी योजना : भारत सरकारची ही योजना देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. ही योजना मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पालक आपल्या मुलींचे अकाउंट ओपन करून तिचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकणार आहेत. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 8.20% या दराने व्याज दिले जात आहे. यामध्ये किमान अडीचशे रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.

3) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थातच पीपीएफ ही योजना गुंतवणूकदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 7.10% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. यात किमान पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येते हे विशेष.

4) टाईम डिपॉझिट स्कीम : पोस्टाच्या या योजनेला पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणूनही ओळखतात. याचे कारण म्हणजे या योजनेचे स्वरूप बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे. टाईम डिपॉझिट स्कीमचा कालावधी एक वर्षांपासून ते पाच वर्ष पर्यंत आहे. यात गुंतवलेल्या रकमेवर 6.90% ते 7.10% यादरम्यान व्याज मिळत आहे. यात किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

5) पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम : MIS म्हणजेच मंथली इनकम स्कीम ही एक फायदेशीर बचत योजना आहे. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.40% या इंटरेस्ट रेटने व्याज मिळत आहे. यात किमान 1500 रुपयांची गुंतवणूक करता येते.