आर्थिक

Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये घरबसल्या ऑनलाईन गुंतवणूक करा आणि मिळवा चांगला परतावा! वाचा स्टेप बाय स्टेप माहिती

Published by
Ajay Patil

Post Office Scheme:- कष्टाने कमावलेल्या पैशांची बचत आणि केलेल्या बचतीची गुंतवणूक या बाबी प्रत्येकाच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. गुंतवणूक केल्यानंतर मिळणारा परतावा आणि सुरक्षा या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती पैसे गुंतवताना बराच विचार करतात. साधारणपणे गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड तसेच विविध बँकांच्या मुदत ठेव योजना इत्यादी पर्यायांचा वापर केला जातो.

परंतु यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांचा विचार केला तर  या योजना देखील गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व चांगला परताव्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पोस्ट ऑफिसने देखील काही गुंतवणूक योजना या ऑनलाइन उघडण्याची सुविधा सुरू केली असल्यामुळे ग्राहकांना या योजनांमध्ये खाते उघडणे किंवा इतर महत्त्वाच्या बाबी ऑनलाईन पद्धतीने करता येणे शक्य झाले आहे.

 पोस्टाच्या या योजनांमध्ये उघडता येईल ऑनलाइन खाते

पोस्ट ऑफिसच्या ज्या काही गुंतवणूक योजना आहेत त्यामधील मासिक उत्पन्न योजना, जेष्ठ नागरिक बचत योजना आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचे खाते आता ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने उघडण्याची सुविधा पोस्ट खात्याच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. तसेच या तीनही योजनांमध्ये ऑनलाईन गुंतवणूक देखील करता येणार आहे.

यामध्ये तुम्हाला काही साध्या आणि सोप्या पायऱ्यांचा अवलंब करणे गरजेचे असून त्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन गुंतवणूक करू शकणार आहात. यासाठीची अधिसूचना देखील पोस्ट ऑफिसकडून जारी करून या संबंधीची माहिती देण्यात आलेली आहे. या अधीसूचनेमध्ये म्हटले आहे की, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना,  नागरिक बचत योजना आणि मासिक उत्पन्न योजना इत्यादी योजनांचे खाते आता ऑनलाइन उघडता येणार असून ही सुविधा पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या इंटरनेट बँकिंग विभागाच्या सामान्य सेवा या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

 या योजनेमध्ये ऑनलाईन खाते कसे उघडावे?

1- यामध्ये सर्वात आधी तुम्हाला पोस्टाच्या बचत खात्याच्या इंटरनेट बँकिंग विभागांमध्ये जाऊन जनरल सर्विसेस टॅब वर क्लिक करणे गरजेचे आहे.

2- त्यानंतर सर्विस रिक्वेस्टवर क्लिक करावे.

3- त्या ठिकाणी न्यू रिक्वेस्ट म्हणजेच नवीन विनंती निवडावी आणि पुढे जाण्यासाठी ओके वर क्लिक करावे.

4- त्यानंतर तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र योजना, मासिक उत्पन्न योजना आणि जेष्ठ नागरिक बचत योजना याकरिता खाते उघडण्यासाठीचे तीन पर्याय दिसतील व त्यापैकी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो तुम्ही निवडावा.

5- त्यानंतर यामध्ये तुम्हाला किती रक्कम ठेव म्हणून ठेवायची आहे ती रक्कम नमूद करावी.

6- हे नमूद केल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसचे डेबिट खाते निवडावे लागेल व व्यवहाराची संपूर्ण माहिती भरावी लागेल.

7- त्यानंतर अटी आणि शर्तींना सहमती देण्याचा जो काही पर्याय येतो त्यावर क्लिक करा.

8- त्यानंतर सबमिट ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ट्रांजेक्शन पासवर्ड टाकावा आणि सबमिट वर क्लिक करावे.

9- त्यानंतर तुम्ही तुमची रकमेची ठेव पावती डाऊनलोड करू शकतात.

 ऑनलाइन गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या तीनही योजनांपैकी तुम्हाला कुठल्याही एका योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसची इंटरनेट बँकिंग सुविधा असणे गरजेचे आहे.

2- ज्येष्ठ नागरिक बचत योजनेकरिता फक्त साठ वर्षावरील व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करू शकतात. या खालचे जे काही पात्र लोक असतील त्यांना पोस्ट ऑफिसच्या शाखेमध्ये जाणे गरजेचे आहे.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनांमध्ये ऑनलाईन खाते हे फक्त इंटरनेट बँकिंग युजर्स आणि त्यांच्या वारस अर्थात नॉमिनी यांच्या नावानेच उघडले जाऊ शकते.

Ajay Patil