Post Office : पोस्ट ऑफिसची महिलांसाठी उत्तम योजना, 2 लाखांवर मिळेल इतका व्याज…

Content Team
Published:
Post Office

Post Office : सध्या बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. पण हे पर्याय जोखमीचे आहेत, अशातच जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला सुरक्षितेसह उत्तम परतावा देखील मिळतो.

पोस्ट ऑफिसमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक गुंतवणूक योजना आहेत, तसेच पोस्टाकडून महिलांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जातात, त्यातलीच एक म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. या योजनेत महिला 2,00,000 जमा करू शकता आणि त्यावर 30,000 चा नफा मिळवू शकता.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने पोस्ट ऑफिस अंतर्गत ही योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर, महिलांना 7.5 टक्के चांगले व्याज दिले जाईल. याशिवाय त्यांचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतील.

तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 2,00,000 जमा केल्यावर 2 वर्षात 30,000 पेक्षा जास्त व्याज दिले जाईल.

या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळते. यामध्ये कोणी 2,00,000 ची गुंतवणूक केल्यास, त्याला पहिल्या वर्षी 15,000 आणि दुसऱ्या वर्षी 16,125, एकूण 31,125 वर व्याज मिळेल. म्हणजेच, जर तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत 2,00,000 जमा केले, तर तुम्हाला 2 वर्षांनी 2 लाख 31,125 परत मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe