Post Office RD : पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना! फक्त व्याजतूनच कराल लाखोंची कमाई…

Content Team
Published:
Post Office RD

Post Office RD : सरकारने पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर नुकतेच जाहीर केले आहेत. यावेळी सरकारने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. अशातच जर तुम्ही पोस्टात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक स्कीम घेऊन आलो आहोत,  ज्या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा कमवू शकता.

आम्ही अशा पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सांगत आहोत जी नोकरदारांसाठी सर्वोत्तम योजना आहे. जर तुमच्याकडे एकत्र गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही दरमहा तुमच्या पगारातून काही पैसे वाचवू शकता आणि पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवू शकता. आम्ही पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमबद्दल बोलत आहोत. येथे सध्या 6.7 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.

जर तुम्ही RD मध्ये दर महिन्याला 7,000 रुपये गुंतवून 5 वर्ष ही गुंतवणूक चालू ठेवली तर तुम्ही एकूण 4,20,000 रुपयांचा निधी उभारू शकता. यामध्ये तुम्हाला 5 वर्षांनी 79,564 रुपये आणि मॅच्युरिटीवर 4,99,564 रुपये व्याज मिळेल.

दरमहा 5,000 रुपयांच्या आरडीमध्ये, तुम्ही एका वर्षात 60,000 रुपये आणि पाच वर्षांत एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला 5 वर्षानंतर 6.7 टक्के दराने 56,830 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,56,830 रुपये मिळतील.

जर तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला 3,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही एका वर्षात 36,000 रुपये गुंतवाल. 5 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1,80,000 असेल. पोस्ट ऑफिसच्या आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरांनुसार, तुम्हाला 34,097 रुपये व्याज म्हणून मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 2,14,097 मिळतील.

लक्षात घ्या RD वर मिळणाऱ्या व्याजावर TDS कापला जातो. RD वर मिळालेल्या व्याजदरांवर 10 टक्के TDS लागू आहे. जर RD वर एक महिन्याचे व्याज 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe