PPF Scheme : करा फक्त 5 हजारांची गुंतवणूक, मिळेल 41 लाखांपेक्षा जास्त परतावा; जाणून घ्या योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF Scheme : तुम्हाला 5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर 41 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळवायची असेल तर तुमच्यासाठी एक खास योजना आहे.सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये अनेकजण गुंतवणूक करत आहेत. कारण यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकजण कर बचतीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असतात. यात गुंतवलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना उत्तम परतावाही मिळतो. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार वार्षिक आणि मासिक या दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

हे लक्षात घ्या की पीपीएफ योजनेमध्ये म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये गुंतवणूकदाराला दीर्घकाळ गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यात गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर उत्तम परतावा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये सरकारी हमीमुळे गुंतवणूकदाराचा पैसाही सुरक्षित असतो. तसेच यामध्ये मिळणाऱ्या रिटर्न्सवर गुंतवणूकदारांना कोणताही कर भरावा लागत नाही.

खरंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही दीर्घकालीन बचत योजना असून योजनेची परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. विशेष म्हणजे तुम्हाला 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी तुमची ठेव रक्कम देखील वाढवता येते.

तुम्हाला या योजनेत केवळ 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यात गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा वार्षिक 1.5 लाख रुपये आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडून गुंतवणूक चालू करता येऊ शकते.

या योजनेत सरकार 7.1 टक्के दराने व्याज देत आहे. हे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. ज्याची गणना चक्रवाढ व्याजाच्या आधारे करण्यात येते, तसेच, गुंतवणुकीच्या बाजाराच्या जोखमीचा म्हणजेच त्यातील चढउतारांचा कोणताही परिणाम होत नाही.

या योजनेअंतर्गत, समजा तुम्ही 5000 रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजेच प्रत्येक वर्षाला 60,000 रुपये 15 वर्षांसाठी गुंतवले, तर सध्याच्या व्याजदरानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर 16,00000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम तुम्हाला मिळेल. तसेच तुम्ही तुमची ठेव आणखी 5 वर्षांसाठी वाढवली तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 41 लाखांपेक्षा जास्त रक्कम सहज मिळेल. समजा तुम्ही या योजनेत प्रत्येक महिन्याला 12500 रुपये म्हणजेच वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केल्यास तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील.