PPF Scheme : पीपीएफमध्ये पैसे गुंतवताय? चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PPF Scheme : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त पसंतीची योजना आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षाचा आहे. पीपीएफमधून चांगला परतावा मिळतो त्याशिवाय करबचतही होते. हे लक्षात घ्या की पीपीएफ खाते परिपक्व झाल्यानंतर तुमच्याकडे तीन पर्याय आहेत.

त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. पीपीएफ ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी सुरक्षित बचत योजना असून यात गुंतवणूक केली तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

या योजनेद्वारे तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसह कर सवलतीचा लाभ घेता येईल. परंतु जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवत असाल तर गुंतवणूकदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, नाहीतर तुम्ही अडचणी येऊ शकता.

जाणून घ्या पीपीएफ योजनेबद्दल

पीपीएफ योजना ही एक दीर्घकालीन योजना असून तुम्हाला या योजनेत 15 वर्षांनंतर मॅच्युरिटी लाभ मिळेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना प्रत्येक वर्षी त्यात पैसे गुंतवावे लागतात. व्याज दराचा विचार केला तर सध्या पीपीएफ खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. तसेच समजा एखाद्या गुंतवणूकदाराने कोणत्याही आर्थिक वर्षात या योजनेत पैसे गुंतवले नाही तर त्याला अनेक समस्या येऊ शकतात. परिणामी त्यांच पीपीएफ खाते निष्क्रिय होण्याची शक्यता असते.

खरंतर पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच गुंतवणूकदारांना एका आर्थिक वर्षात PPF खात्यात कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तर त्याच वेळी, आयटीआर दाखल करत असताना त्यांना जुन्या कर प्रणाली अंतर्गत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेद्वारे 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळेल.

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने एका आर्थिक वर्षात PPF खात्यात 500 रुपये गुंतवले नाही तर त्या गुंतवणूकदारांना खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांचे खाते निष्क्रिय होते. PPF खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. इतकेच नाही तर त्यांचे निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्यासाठी शुल्क भरावे लागते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात कमीत कमी गुंतवणूक रक्कम जमा करणे गरजेची आहे.