PPF VS SIP : एसआयपी की पीपीएफ?, 15 वर्षात कोणती गुंतवणूक करेल मालामाल, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIP vs PPF : जर तुम्ही दीर्घमुदतीसाठी एक उत्तम योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी अशा दोन गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात मोठा निधी गोळा करू शकता. आज आम्ही एसआयपी आणि पीपीएफ या दोन योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुधारू शकता.

एसआयपी आणि पीपीएफ या दोन्हीपैंकी दीर्घकाळासाठी कोणता पर्याय योग्य असेल हे आजच्या बातमीद्वारे सांगणार आहोत. जर तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला योग्य गुंतवणूक निवडण्यास मदत करेल.

पीपीएफ

PPF ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये हमीभावाने पैसे उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय गुंतवणूक करू शकता. PPF खाते 15 वर्षांत परिपक्व होते. सध्या पीपीएफमधील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्ही एका आर्थिक वर्षात PPF मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

अशा परिस्थितीत, लक्षात ठेवा की जर तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढले तर 1 टक्के व्याज कापून तुम्हाला पैसे परत केले जातील. यामध्ये तुम्हाला दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो.

SIP

SIP हा म्युच्युअल फंडासारखा आहे. SIP मध्ये गुंतवणुकीत खूप चढ-उतार असतात. विशेषत: एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. तज्ञांच्या मते, SIP मध्ये चांगला फंड बनवण्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल.

दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल उत्तम परतावा?

पीपीएफमध्ये 5 हजार रुपये गुंतवल्यास वर्षाला 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली जाईल. 15 वर्षे हे असेच चालू राहिले तर तुम्ही PPF मध्ये एकूण 9 लाख रुपये गुंतवाल, यावर तुम्हाला 7.1 टक्के रिटर्नवर 7,27,284 रुपये व्याज मिळेल. त्यानंतर मॅच्युरिटी झाल्यावर ही रक्कम 16 लाख 27 हजार 284 रुपये असेल.

जर तुम्ही एसआयपीमध्ये 15 वर्षांसाठी 5,000 रुपये गुंतवले आणि एकूण 9 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 12 टक्के परतावा मिळेल. या गणनेनुसार तुम्हाला 15 वर्षांत 16 लाख २२ हजार 880 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला व्याज आणि गुंतवणुकीची रक्कम एकत्र मिळेल. जी 25 लाख 22 हजार 880 होईल. लक्षात ठेवा की बाजारात एसआयपी परतावा कमी किंवा जास्त असू शकतो.