आर्थिक

Business Success Story: उच्चशिक्षित तरुणाने टाकाऊ वस्तु पासून उभारला करोडो रुपयांचा व्यवसाय! आज आहे कंपनीची 300 कोटींची उलाढाल

Published by
Ajay Patil

Business Success Story:-आजकाल तरुणांच्या डोक्यामध्ये अनेक व्यवसायांच्या वेगवेगळ्या कल्पना असतात व या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात व जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यशस्वी होतात. कारण व्यक्तीमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द राहिली

व मनात ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करून यश मिळवण्याची जबर इच्छाशक्ती राहिली तर या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही व अशा पद्धतीने काम करणारे अनेक व्यक्ती आपल्याला दिसून येतात. अगदी याच पद्धतीने जर आपण छत्तीसगड मधील भिलाई येथे जन्मलेल्या राहुल सिंग यांची यशोगाथा पाहिली तर अशीच काहीतरी आहे.

 टाकाऊ वस्तूंपासून करत आहे करोडोचा व्यवसाय

सविस्तर वृत्त असे की, राहुल सिंग यांचा जन्म छत्तीसगड मधील भिलाई या ठिकाणी एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. लहानपणी शिक्षणाला सुरुवात करताना ही त्या ठिकाणी असलेल्या सरकारी शाळेतून सुरू झाली. 2005 मध्ये सुरत येथून त्यांनी बीटेक पूर्ण केले व नंतर जमशेदपूरच्या झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घेऊन एमबीए देखील केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळावी याकरिता 2018 मध्ये राहुल अमेरिकेला गेला. या कालावधीत 2008 ते 2019 या दहा ते अकरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले. परंतु अमेरिकेतल्या कंपन्यांमधील कामात राहुल यांचे मन लागत नव्हते व त्यांच्या मनामध्ये स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा हे होते.

तसेच राहुल यांना नेहमी पर्यावरणाची आवड असल्यामुळे काहीतरी पर्यावरणाशी संबंधित व्यवसाय करावा असे देखील बऱ्याचदा मनात येत होते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राहुल यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु हे एवढे सोपे काम नव्हते व त्यामध्ये सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु न डगमगता या अडचणींना तोंड देत आपला प्रवास सुरू ठेवला.

 अशाप्रकारे झाली कंपनीची सुरुवात

जेव्हा राहुल अमेरिकेमध्ये कंपनीत काम करत होता तेव्हा त्या ठिकाणी राहुलची भेट अरविंद गणेशन यांच्याशी झाली व या दोघांनी मिळून 2020 मध्ये वाशिंग्टन येथे इकोसोल होम नावाची कंपनी सुरू केली व हा व्यवसाय वाढवायचे त्यांनी ठरवले. त्यानंतर राहुल अमेरिकेतून भारतात परत आला.

आज पाहता पाहता या कंपनीचा व्यवसाय भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा, युके  आणि जर्मनी इत्यादी देशांमध्ये पसरलेला असून 150 पेक्षा जास्त उत्पादन युनिट बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहेत. आज राहुल यांच्या कंपनीची उलाढाल तीनशे कोटींपेक्षा जास्त असून महत्वाचे म्हणजे राहुलने त्याच्या कंपनीच्या माध्यमातून 1.3 दशलक्ष टन प्लास्टिक वाचवले आहे.

 इकोसोल होमचे कार्य काय आहे?

असंख्य अडचणींना तोंड देऊन राहुल सिंगने स्वतःचा व्यवसाय उभा केला व टाकाऊ पासून कोटी रुपयांचा व्यवसाय आज निर्माण केलेला आहे. राहुलने त्याची इकोसोल होम ही कंपनी अक्षरशः घर विकून सुरू केलेली आहे.

ही कंपनी प्रामुख्याने झाडांचे पाने आणि बांबू सारख्या साहित्यापासून अनेक पर्यावरण पूरक उत्पादने बनवते व आज या कंपनीची  उलाढाल तीनशे कोटींपेक्षा जास्त आहे.

यावरून आपल्याला दिसून येते की, मनामध्ये काहीतरी ध्येय असले आणि ते पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असली तर व्यक्ती यशस्वी होतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil