आर्थिक

रेल्वेने प्रवास करताना आली कुठली समस्या तर डोन्ट वरी! फक्त ‘या’ ठिकाणी कॉल करा; झटक्यात होईल समस्येचे निराकरण

Published by
Ratnakar Ashok Patil

Railway Helpline:- भारतामध्ये रेल्वेचे नेटवर्क खूप मोठे असून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. दुसरे महत्वाचे म्हणजे इतर जे काही वाहतुकीचे साधने आहेत त्यांच्या तुलनेमध्ये हा स्वस्त आणि किफायतशीर असा वाहतुकीचा पर्याय आहे. या सगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी ट्रेनने प्रवास करतात व या सगळ्या कारणांमुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेखा म्हणून देखील संबोधले जाते.

या सगळ्या प्रवाशांच्या अनुषंगाने जर आपण भारतीय रेल्वेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या सोयीसुविधा जर बघितल्या तर त्या देखील खूप महत्त्वाचे आहेत. प्रवाशांसाठी अनेक नियम तसेच सोयीसुविधा रेल्वेने केल्या असून त्यांचा उद्देश फक्त एवढा आहे की प्रवाशांना प्रवास करताना उत्तम प्रवाशाचा अनुभव देणे हा आहे.

परंतु तरीदेखील रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात व अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेक घटनांवरून आपल्याला दिसून येते. अगदी साध्या साध्या समस्या आपल्याला प्रवासात येत असतात. यामध्ये खराब सीट मिळणे किंवा रेल्वे स्टेशनवर पुरेशा सुविधा उपलब्ध नसणे.

बऱ्याचदा ट्रेन मधील पंखे किंवा इतर गोष्टी व्यवस्थित काम करत नाहीत किंवा चार्जिंग पॉइंट तरी बिघडलेला असतो. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या रेल्वेने प्रवास करताना येऊ शकतात.

त्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते व मनात प्रश्न येतो की अशा समस्यांच्या बाबत तक्रार करायची तर नेमकी कुठे करायची? त्यामुळे याबाबतच्या भारतीय रेल्वेचे हेल्पलाइन नंबर कोणते आहेत? याचीच माहिती थोडक्यात बघणार आहोत.

रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139
रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 हा खूप महत्त्वाचा असून जर प्रवास करत असताना काही समस्या आली किंवा काही वैद्यकीय समस्या उद्भवली तर तुम्ही 139 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत घेऊ शकतात व इतकेच नाही तर या क्रमांकावर कॉल करून ट्रेनमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तरी तुम्हाला मदत मिळू शकते.

या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून तक्रार दाखल करताना फक्त तुम्हाला तुमचा पीएनआर क्रमांक, सीट क्रमांक आणि तुम्ही कोणत्या बोगीतून प्रवास करत आहात इतका तपशील फक्त नमूद करावा लागतो व त्यानंतर तुमची समस्या किंवा तक्रार दूर केली जाते.

Rail Madad ॲप किंवा पोर्टलवर तक्रार नोंदवता येते
139 या हेल्पलाइन क्रमांका व्यतिरिक्त प्रवासामध्ये जर काही समस्या आली तर प्रवासी हे रेल मदद(Rail Madad) एप्लीकेशन किंवा पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकतात. तुम्हाला जर या पोर्टलवर किंवा एप्लीकेशन वर तक्रार दाखल करायची असेल तर येथे देखील तुम्हाला तुमचा पीएनआर क्रमांक,

सीट क्रमांक आणि तुम्ही कोणत्या बोगीतून प्रवास करत आहात हे नमूद करावे लागते व त्यानंतर विचारलेला सर्व आवश्यक तपशील देखील तुम्हाला भरावा लागतो किंवा सांगावा लागतो. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहजतेने तुमची तक्रार नोंदवू शकतात आणि तुमची तक्रार नोंदवल्यानंतर त्वरित तुम्हाला मदत या माध्यमातून दिली जाते.

Ratnakar Ashok Patil