Railway Stock : अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला बाजाराची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. कारण यामध्ये खूप मोठी जोखीम घ्यावी लागते.
गुंतवणूकदारांना प्रत्येक वेळी उत्तम परतावा मिळतोच असे नाही. अशातच आता रेल्वेच्या शेअर्सवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आज आनंद साजरा करत आहेत. कारण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे.
गुंतवणूकदार झाले मालामाल
सोमवारचा वेग मंगळवारीही कायम राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवारी बीएसईमध्ये IRFC चे शेअर्स 69.61 रुपयांच्या पातळीवर उघडले आहेत. जे काही वेळातच एकूण 75.72 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. ही कंपनी 52 आठवडे उच्च राहिली आहे. दुपारी 2 च्या सुमारास या कंपनीच्या शेअरचा भाव 72.63 रुपयांच्या पातळीवर गेला होता.
मार्केट कॅप
आज IRFC चे मार्केट कॅप 90,000 कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि IRCTC पेक्षा ही कंपनी अधिक मौल्यवान कंपनी बनली आहे. IRFC ची मार्केट कॅप सध्या ऐकून 95,000 कोटी रुपये इतकी आहे. आता या कंपनीकडे 1 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलांडण्याची सुवर्णसंधी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेअर प्रॉफिट बुकींगचा बळी ठरला नाही, तर आगामी काळात ही कंपनी एक नवीन इतिहास रचेल.
2 वर्षांच्या कालावधीनंतर कंपनी वेगात
खरतर IRFC जानेवारी 2021 रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध झाली आहे. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दोन वर्षांत, या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग किंमत सुमारे 26 रुपये इतकी होती. परंतु या वर्षी मार्चपासून आयआरएफसीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. एकदा या कंपनीच्या शेअर्सला गती मिळाली की IRFC ने मागे वळून पाहिले नाही. 80 हजार कोटी रुपयांपासून 90 हजार कोटी रुपयांच्या मार्केट कॅपपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीला काही दिवसाचा कालावधी लागला.