Categories: आर्थिक

मुथूट फायनान्स आणि मनप्पुरम फायनान्सवर रिझव्ह बँकेची कारवाई ; झालेय ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी सांगितले की त्यांनी मुथूट फायनान्स, एर्नाकुलम वर दहा लाख रुपये आणि थ्रिसुरच्या मनप्पुरम फायनान्सवर पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, सोने कर्जामध्ये लोन टू वैल्यू रेश्यो मेंटेन करण्यासाठी आणि पाच लाखाहून अधिक सोन्याच्या कर्जास मान्यता देताना ग्राहकाच्या पॅनकार्डची प्रत घेण्याच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे मुथूट फायनान्सला दंड ठोठावण्यात आला.

आरबीआयने आणखी एका निवेदनात म्हटले आहे की सोन्याच्या दागिन्यांच्या मालकीच्या पडताळणीसंदर्भातील निर्देशांचे पालन न केल्यामुळे मनप्पुरम फायनान्सला दंड ठोठावण्यात आला. आरबीआयने मात्र या दोन्ही प्रकरणात स्पष्टीकरण दिले की रेगुलेटरी कंप्लायंसच्या अभावामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

या क्रियेचा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराच्या वैधतेशी काहीही संबंध नाही. मुथूत फायनान्स आणि मनप्पुरम फायनान्स दोघेही गोल्ड लोनचा व्यवसाय करतात. मुथूट फायनान्स संदर्भात आरबीआयने सांगितले की कंपनीच्या आर्थिक स्थितीची 31 मार्च 2018 आणि 31 मार्च 2019 रोजी तपासणी करण्यात आली होती,

ज्यामध्ये नॉन-कंप्लायंसचा खुलासा झाला होता. नॉन-कंप्लायंस बद्दल दंड का लावू नये, अशी विचारणा करणारी आरबीआयने कंपनीला नोटीस पाठविली होती. त्यानंतर कंपनीने नोटीसला दिलेला जबाब , तोंडी उत्तर आणि कंपनीने दिलेली अतिरिक्त उत्तरे यांचे विश्लेषण करून कंपनीला दंड ठोठावण्यात आला.

मनप्पुरम फायनान्सच्या बाबतीत, आरबीआयने 31 मार्च 2019 रोजी कंपनीच्या आर्थिक स्थितीची देखील पाहणी केली. या कालावधीत, सूचनांचे पालन न केल्याचे आढळले. या प्रकरणात देखील कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती आणि नोटीसचे उत्तर, तोंडी उत्तर आणि अतिरिक्त उत्तरांचे विश्लेषण केल्यानंतर कंपनीला दंड ठोठावण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24