आर्थिक

कोटक महिंद्रा बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली कारवाई! पण आता खातेधारकांचे काय? वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

भारतीय रिझर्व बँक ही देशातील सर्वात मोठी बँक असून देशातील इतर बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम रिझर्व बँकेच्या माध्यमातून केले जाते. रिझर्व बँकेने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीतच इतर बँकांना  काम करावे लागते.

जर हे नियम मोडले तर रिझर्व बॅंकेकडून संबंधित बँकांवर कारवाई केली जाते व गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिले असेल की देशातील बऱ्याच बँकांवर भारतीय रिझर्व बॅंकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची कारवाई कोटक महिंद्रा बँकेवर देखील आरबीआयने केली असून त्यानुसार आता कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे नवे ग्राहक जोडता येणार नाहीत

व एवढेच नाही तर क्रेडिट कार्ड देण्याबाबत देखील बँकेवर प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांचे कोटक महिंद्रा बँकेमध्ये खाते आहे अशा खातेधारकांना मात्र अनेक प्रश्न पडले आहेत. जसे की जर आता कोटक बँकेमध्ये एखाद्याला नवीन खाते उघडायचे असेल तर ते उघडता येईल का? तसेच कोटक महिंद्रा बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर त्याचे रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरण करता येईल का? असे अनेक प्रश्न खातेधारकांना पडलेले आहेत. यासंबंधीचीच माहिती आपण बघू.

 कोटक महिंद्रा बँकेच्या संदर्भात

आरबीआयने घेतलेल्या निर्णयाचा खातेधारकांवर काय होईल परिणाम?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोटक महिंद्रा बँकेमध्ये ज्या ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने खाते उघडले असतील त्यांना रिझर्व बँकेच्या या निर्णयाचा कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही किंवा फटका बसणार नाही.

अशा पद्धतीने खाते उघडलेले खातेदार त्यांचे खाते इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे वापरू शकणार आहेत. एवढेच नाही तर रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेसंबंधी घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम बँकेतील कोणत्याही खात्यावर होणार नाही.

1- कोटक 811 डिजिटल खाते आता उघडता येईल का?- कोटक महिंद्रा बँकेचे कोटक बँक 811 हे डिजिटल अकाउंट उघडण्यासाठी वापरले जात होते व याचा वापर करून ग्राहक घर बसल्या या बँकेत ऑनलाईन पद्धतीने खाते उघडू शकत होते. परंतु आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयानंतर नवीन ग्राहकांना अशा पद्धतीने खाते उघडता येणार नाही.

2- बँकेच्या क्रेडिट कार्डचा ग्राहकांवर काय परिणाम होईल?- रिझर्व बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर जे काही निर्बंध लादलेले आहेत त्याचा ग्राहकावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु तुम्हाला जर क्रेडिट कार्ड नूतनीकरण करायचे असेल तर बँकेकडून तुम्हाला सर्व माहिती घेता येणार नाही. याबाबत कोटक बँकेने माहिती दिली आहे की क्रेडिट कार्ड युजर्सना कार्ड नूतनीकरण करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

 रिझर्व बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर

काय कारवाई केली?

भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून कोटक महिंद्रा बँकेच्या काही सेवांवर बंदी घालण्यात आलेली असून त्यानुसार आता बँकेला ऑनलाइन आणि मोबाईल बँकेद्वारे नवीन ग्राहकांचे अकाउंट उघडता येणार नाही.

एवढेच नाही तर बँकेला आता नवीन क्रेडिट कार्ड देखील जारी करता येणार नाही. या कारवाई मागे  महत्वाचे कारण देताना आरबीआयने सांगितले की, कोटक महिंद्रा बँकेच्या डिजिटल ऑपरेशन संबंधित काही उणिवा आढळून त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Ajay Patil