RBI Banking News : मे महिना हा जवळपास संपण्यात जमा आहे. येत्या तीन दिवसांनी जून महिन्याला सुरवात होणार आहे. दरम्यान जून महिना सुरू होण्यापूर्वी बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआयने जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
खरंतर पुढील महिन्यात कोणताचं मोठा सण नाहीये. तरीही पुढील महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या तारखांना सुमारे 10 दिवस बँका बंद केल्या जाणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जून 2024 च्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज आपण आरबीआयने जारी केलेली हीच सुट्ट्यांची यादी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यामुळे जर तुम्हालाही जून महिन्यात बँकेशी निगडित कामे करण्यासाठी बँकेत जायचे असेल तर आधी ही सुट्ट्यांची यादी चेक करावी लागणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया बँकेच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी.
जून महिन्यातील बँकेची सुट्ट्यांची यादी
15 जून – मिझोराममधील बँका YMA दिनानिमित्त बंद राहतील. त्याचवेळी रज संक्रांतीनिमित्त ओडिसामध्ये बँकेला सुट्टी राहणार आहे.
17 जून – आगरतळा, अहमदाबाद, गुवाहाटी, हैदराबाद, लखनौ, दिल्ली, इंफाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोहिमा, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर येथे बकरी ईद असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर गंगटोक आणि इटानगरमध्ये बँका सुरू राहतील. येथे बकरी ईदची सुट्टी राहणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
18 जून – बकरी ईद सणानिमित्त जम्मू-काश्मीरमधील बँका बंद ठेवल्या जाणार आहेत.
5 रविवार आणि 2 शनिवारी बँक बंद राहणार
पुढील महिन्यात 2, 9 16 23 आणि 30 जून रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी राहणार आहे. रविवारी देशभरातील बँकांचे कामकाज बंद राहते. पुढील महिन्यात पाच रविवार येत असल्याने हे पाच दिवस बँका बंद राहतील.
याशिवाय आठ जूनला दुसरा शनिवार आणि 22 जूनला म्हणजे महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँकेला कुलूप राहणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. म्हणजेच जून महिन्यात पाच रविवार आणि दोन शनिवारच्या सुट्ट्या पकडून देशातील काही भागांमध्ये दहा दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत.