Reserve Bank of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) तीन दिवसांच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी रेपो दर 6.50 टक्के ठेवण्याची घोषणा केली.
ज्यांनी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक केली आहे त्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एफडीवर जास्त व्याज मिळत राहणार आहे. त्यांच्या व्याजात काही बदल करण्यात आलेला नाही.
* रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा प्रभाव, नाही घटणार एफडीचे व्याजदर
देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो दरात एकूण 2.5 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर सलग चौथ्यांदा रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रेपो दरवाढीनंतर बहुतांश बँका जास्त व्याज दर देत आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर अधिक व्याज मिळत आहे. रेपो दरात कोणताही बदल न झाल्यास बँका या काळात ग्राहकांना जास्त व्याज दर देऊ शकतात.
रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दर कायम ठेवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त व्याज दर मिळत राहतील. मध्यवर्ती बँक जेव्हा रेपो रेट वाढवते तेव्हा बँक सहसा एफडीचा व्याजदर वाढवते आणि जेव्हा मध्यवर्ती बँक रेपो रेट कमी करते तेव्हा एफडीचा व्याजदर कमी होतो.