Pm Surya Ghar Yojana:- सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यातील काही योजना कृषी क्षेत्रासाठी आहेत तर काही योजना या घरगुती ग्राहकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
या योजनांच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना सरकारच्या या योजनांच्या माध्यमातून अनुदानाची मदत मिळत असते. या योजनांसारखीच एक योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली व या योजनेचे नाव म्हणजे पंतप्रधान सूर्य घर योजना होय.
या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी घरांना मोफत वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे व याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 75000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक देखील करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचा लाभ तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर त्याकरिता अर्ज करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी तुम्ही कसा अर्ज करू शकतात याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
या योजनेसाठी पाच मिनिटात करता येईल अर्ज
या मोफत वीज योजनेअंतर्गत अर्ज करणे खूप सहज आणि सोपे आहे व याकरिता तुम्हाला फक्त पाच मिनिटे देणे गरजेचे आहे. या अर्जाकरिता तुम्हाला या योजनेची वेबसाईट, https://pmsuryaghar.gov.in वर अर्ज करावा लागेल.
या योजनेच्या अंतर्गत 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे व अनुदानाचा लाभ देखील सरकार देणार आहे. विशेष म्हणजे हा सबसिडीचा लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट पाठवला जाणार आहे.
अशा पद्धतीने करा घरबसल्या नोंदणी
1-https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि रूप-टॉप सोलरसाठी अर्ज करा या पर्यायाची निवड करावी.
2- त्यानंतर तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीचे नाव निवडावे. त्यानंतर तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल नमूद करावा.
3- त्यानंतर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून नवीन पेजवर लॉगिन करावे. हे केल्यानंतर त्या ठिकाणी एक फॉर्म ओपन होतो आणि त्यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रूप-टॉप सोलर पॅनलसाठी अर्ज करावा.
4- प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला व्यवहार्यता मंजुरी मिळेल व त्यानंतर तुम्ही तुमच्या डिस्कॉममध्ये नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट इन्स्टॉल म्हणजेच स्थापित करू शकतात.
5- सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये प्लांटचा संपूर्ण डिटेल सह नेट मीटरसाठी अर्ज करावा लागतो.
6- नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला एक कमिशनिंग प्रमाणपत्र जारी केले जाईल.
7- हे प्रमाणपत्र जारी केल्यानंतर तुम्हाला पोर्टल द्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल व यानंतर या योजनेच्या माध्यमातून मिळणारी सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
या योजनेत तुम्हाला किती खर्च करावा लागेल?
समजा तुम्हाला जर तुमच्या घरात 2kW चा रूफटॉप सोलर बसायचा असेल तर या योजनेच्या वेबसाईटवर जे काही कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे त्यानुसार पाहिले तर एकूण प्रकल्पाची किंमत 2 kW साठी 47 हजार रुपये असेल.
यावर शासनाकडून तुम्हाला 18 हजार रुपयांच्या अनुदान दिले जाईल. म्हणजेच ग्राहकाला 29 हजार रुपये खर्च करावा लागेल. तसेच नियमानुसार याकरिता 130 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल.
या 47 हजार रुपये खर्चून बांधलेल्या सोलर प्लांटच्या माध्यमातून तुम्हाला दररोज 4.32 kWh/ प्रति दिवस वीज निर्मिती करता येईल. म्हणजेच वार्षिक आधारावर पाहिले तर 1576 kWh इतकी वीज निर्मिती होईल. यामुळे ग्राहकाची दररोज 12.96 रुपये आणि वर्षभरात 4730 रुपये बचत होईल.
3kW पॅनलसाठी किती खर्च करावा लागेल?
जर तुमचे रूप-टॉप क्षेत्र 700 स्क्वेअर फुट असेल तर तीन किलो वॅट पॅनलकरिता तुम्हाला 80 हजार रुपये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 36 हजार रुपयांचे अनुदान मिळेल. म्हणजेच तुम्हाला 50 हजार रुपये यासाठी खर्च करावा लागेल.