आर्थिक

‘या’ बँकांच्या विशेष एफडी योजना संपण्यासाठी उरले दोन दिवस! नाहीतर हातातून घालवाल 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवण्याची संधी

Published by
Ajay Patil

बँकांच्या एफडी म्हणजेच मुदत ठेव योजना या गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाच्या आणि पसंतीचा पर्याय म्हणून ओळखला जातो. कारण बँकांच्या या योजनांमध्ये एफडी केल्यानंतर गुंतवणूक सुरक्षित राहते तसेच परतावा देखील चांगला मिळतो. याकरिता मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये एफडी केली जाते. परंतु यामध्ये काही बँका ग्राहकांसाठी विशेष एफडी योजना अंतर्गत  त्यामध्ये गुंतवणुकीचे संधी देतात व चांगल्या प्रकारे त्यावर व्याज देखील देतात.

यामध्ये आता इंडियन बँक तसेच आयडीबीआय आणि पंजाब अँड सिंध बॅंकेच्या ग्राहकांसाठी बँकेच्या माध्यमातून ज्या काही विशेष एफडी योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या त्यांची मुदत 30 जून 2024 पर्यंत आहे. म्हणजेच या तीनही बँकांच्या या विशेष एफडीमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर ती फक्त 30 जून 2024 पर्यंतच करता येणार आहे.

याविषयी एफडी योजनांच्या माध्यमातून या बँका आठ टक्क्यांचे व्याज देत आहेत. त्यामुळे कमी वेळेत चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही 30 जून पर्यंत या एफडीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र याविषयीची योजनांमध्ये ग्राहकांना गुंतवणूक करता येणार नाही.

 कसे आहे या तिन्ही बँकांच्या विशेष मुदत ठेव योजनांच्या स्वरूप?

1- आयडीबीआय बँक विशेष मुदत ठेव योजना आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी विशेष मुदत ठेव योजना ऑफर करण्यात आलेली आहे व या माध्यमातून बँक तीनशे दिवस, 375 आणि 444 दिवसांची विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी ग्राहकांना देत असून त्यावर 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. या विशेष एफडी योजनेची शेवटची मुदत 30 जून 2024 पर्यंत आहे.

तसेच आयडीबीआय बँकेच्या वेबसाईट नुसार बघितले तर तुम्ही बँकेच्या उत्सव एफडी योजनेमध्ये 30 जून 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकणार आहात. यावर बँकेच्या माध्यमातून नियमित ग्राहक व त्यासोबतच एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

या विशेष एफडीमध्ये गुंतवणूकदारांना बँकेकडून मुदतपूर्व  पैसे काढण्याची आणि एफडी बंद करण्याची परवानगी देखील देते. तसेच आयडीबीआय बँकेच्या 375 दिवसांच्या उत्सव एफडी योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.60% व्याज मिळते. या एफडी योजनेमध्ये देखील बँकेकडून एफडी मध्ये मुदतपूर्व पैसे काढणे किंवा पैसे बंद करण्याचा पर्याय देते.

2- इंडियन बँक एफडी आयडीबीआय प्रमाणे इंडियन बँकेच्या माध्यमातून देखील ग्राहकांना विशेष एफडी योजना ऑफर करण्यात आलेली आहे. या माध्यमातून ही बँक ग्राहकांना तीनशे ते चारशे दिवसांची एफडी ऑफर करत असून या बँकेच्या वेबसाईट नुसार बघितले तर तुम्ही इंड सुपर 400 आणि इंड सुप्रीम 300 दिवस नावाच्या एफडी योजनांमध्ये 30 जून 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकणार आहात.

यामध्ये जर आपण इंड सुपर 400 दिवसांची एफडी योजनेचे स्वरूप पाहिले तर ती 400 दिवसांसाठी असून यामध्ये तुम्ही दहा हजारापासून ते दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात व सर्वसामान्य ग्राहकांना यावर 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना आठ टक्क्यांपर्यंत व्याज देते.

त्यासोबतच इंड सुपर 300 दिवसांच्या एफडीमध्ये इंडियन बँक ही तीनशे दिवसांकरिता पाच हजार रुपयांपासून ते दोन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करण्याची संधी देते. या गुंतवणुकीवर बँक 7.05 टक्क्यांपासून ते 7.80% पर्यंत व्याज देत आहे.

3- पंजाब आणि सिंध बँक विशेष एफडी योजना पंजाब आणि सिंध बँक आपल्या ग्राहकांना 222 तसेच 333 दिवस आणि 444 दिवसांची विशेष एफडी ऑफर करत असून या एफडीवर जास्तीत जास्त 8.5% व्याज उपलब्ध आहे.

‘या’ बँकांच्या विशेष एफडी योजना संपण्यासाठी उरले दोन दिवस! नाहीतर हातातून घालवाल 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवण्याची संधी

यामध्ये जर बँकेची वेबसाईटनुसार माहिती घेतली तर बँक 222 दिवसांच्या एफडीवर 7.05%, ची 333 दिवसांच्या एफडीवर 7.10% आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या एफडीवर 8.05% व्याज बँकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

Ajay Patil