आर्थिक

Youtube Earning: स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले, परंतु कसा मिळेल यातून पैसा? वाचा यूट्यूबच्या माध्यमातून कसा मिळतो पैसा?

Published by
Ajay Patil

Youtube Earning:- सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो व त्यामध्ये फेसबुक तसेच इंस्टाग्राम व यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती आपल्याला अगदी एका क्लिकवर उपलब्ध होत असते.

परंतु सोशल मीडिया वापराच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असल्यामुळे त्याचा वापर करताना खूप सावधानता बाळगणे देखील तितकेच गरजेचे आहे. जर आपण सोशल मीडियाच्या चांगल्या बाजूंचा विचार केला तर तुम्ही युट्युब,इंस्टाग्राम सारख्या साईटच्या माध्यमातून खूप सारा पैसा कमावू शकतात.

आपण पाहतो की सध्या युट्युब वर अनेक तरुण-तरुणींनी चॅनल सुरू केले आहेत व वेगवेगळ्या विषयांची माहिती देऊन त्या माध्यमातून प्रचंड असा पैसा देखील मिळवत आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न येत असेल की नेमके youtube च्या माध्यमातून पैसा मिळतो कसा? असे कोणते मार्ग आहेत की युट्युबच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळू शकतात? त्याबद्दलचेच महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघू.

 यूट्यूब चैनल सुरू केले आणि व्हिडिओ अपलोड केले तर लगेच पैसा मिळतो का?

समजा तुम्ही नुकतेच youtube चॅनेल सुरु केले व त्यावर तुम्ही तुमच्या ज्या विषयाशी सुसंगत चैनल सुरू केले आहे त्यासंबंधीचे व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला लगेच पैसे मिळत नाहीत. याकरिता तुम्हाला चॅनलच्या सेटिंगमध्ये जाऊन त्या ठिकाणी जाहिरात मिळवण्यासाठी अप्लाय करावे लागते व काही काळानंतर तुमचे अकाउंट अप्रुव्हल केले जाते व त्यानंतर व्हिडिओच्या जाहिरातीनुसार तुम्हाला पैसे मिळतात.

 जाहिरातींपासून मिळतो पैसा

तुमच्या youtube चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून तुम्ही मोठी कमाई करू शकतात. तुमच्या चॅनलवर जे जे व्यक्ती व्हिडिओ पाहतात आणि त्यावर आलेल्या जाहिराती प्ले करतात तेव्हा तुम्हाला पैसे मिळत असतात. युट्युबबरला मिळणारे पैसे हे वेगवेगळ्या कंटेंटवर वेगवेगळ्या जाहिरातीनुसार बदलत असतात. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जाहिरात हा youtube च्या माध्यमातून कमाई करण्याचा प्रमुख स्त्रोत आहे.

 यूट्यूबच्या माध्यमातून ब्रँड प्रमोशन हा आहे कमाईचा उत्तम मार्ग

ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून देखील तुम्ही यूट्यूब चैनलद्वारे कमाई करू शकतात. परंतु याकरिता तुमच्याकडे भरपूर सबस्क्राईबर असणे गरजेचे आहे. यामध्ये जेव्हा तुम्हाला एखाद्या मोठ्या ब्रँडची जाहिरात करण्याची संधी प्राप्त होते तेव्हा तुम्ही ब्रँड प्रमोशन मधून चांगले पैसे मिळवू शकतात. परंतु सुरुवातीला जर तुम्हाला लहान लहान ब्रॅण्डची जाहिरात करण्याची संधी मिळाली तरी त्या संधीचे सोने करावे. कारण या माध्यमातूनच तुमच्याकडे मोठ्या जाहिराती येऊ शकतात व त्यासंबंधीचा करार मिळू शकतो.

 एफिलीएट मार्केटिंग

या माध्यमातून देखील चांगला पैसा यूट्यूबरला मिळतो. यामध्ये एफिलीयट लिंक द्वारे देखील चांगला पैसा मिळवू शकतात. याकरिता युट्युबर्स हे एखादी संलग्न लिंक वापरून तुम्हाला काहीतरी खरेदी करण्यास सांगतात. जेव्हा या लिंकच्या माध्यमातून काही वस्तूंची खरेदी केली जाते तेव्हा संबंधित उत्पादन त्याच किमतीला मिळते ज्यावर ते विकले जाते. परंतु यामधील छोटासा नफ्यातील भाग हा युट्युबरला मिळत असतो व या माध्यमातून लिंकचा प्रचार केल्यामुळे युट्युबर्सला चांगली कमाई होते.

 स्वतःची उत्पादने असतील तर ते देखील विकता येतात

समजा तुमचे स्वतःचे काही उत्पादने असतील तर ते तुम्ही या माध्यमातून विकून चांगली कमाई करू शकतात. यामध्ये युट्युबर्स त्यांच्या youtube व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात देखील करतात व त्यांची विनामूल्य विक्री करतात. त्यावेळी जर व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात पाहिले गेले तर त्यावरून जाहिरातीमधून देखील पैसे कमवता येतात. तसेच स्वतःच्या उत्पादनांची या माध्यमातून जाहिरात झाल्यामुळे उत्पादनांची विक्री वाढते व त्या माध्यमातून देखील चांगला पैसा मिळतो.

Ajay Patil