आर्थिक

EPFO Update: पीएफ खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजात 8.25% इतकी वाढ! पण कधी जमा होणार खात्यात हे व्याज? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

EPFO Update:- नुकतीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली व त्यानुसार खातेधारकांना जमा होणाऱ्या रकमेवर जे काही व्याज दिले जाते

त्यामध्ये ईपीएफओने वाढ करत व्याजदर आता 8.25% इतके मंजूर केलेले आहे. ईपीएफओ ने घेतलेले या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी पीएफ धारकांना होणार आहे.

परंतु आता प्रश्न असा आहे की ईपीएफओच्या माध्यमातून जे व्याजदर मंजूर करण्यात आलेला आहे ते कधी खात्यात जमा होणार? याचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 ईपीएफओने केली व्याजदरात 8.25 टक्के वाढ

 सीबीटीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी पीएफ खातेधारकांसाठी देण्यात येणारा व्याजदर 8.25% इतका मंजूर केला आहे. या अगोदर पीएफ खातेधारकांना 8.15% टक्के आणि ८.१० टक्के अनुक्रमे 2022-23 व 2021-22 मध्ये मिळत होता.

आता ही तीन वर्षातील सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे. यावेळी ईपीएफओ च्या माध्यमातून 1.07 लाख कोटी रुपये व्याज म्हणून वितरित करण्यात येणार आहे.

 पीएफ खातेधारकांना व्याजाच्या पैशांसाठी करावी लागणार प्रतीक्षा

  ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळ अर्थात सीबीटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता कोट्यावधी पीएफ खाते धारकांना व्याजाचे पैसे खात्यात जमा होण्याची प्रतीक्षा आहे. परंतु यामध्ये जर आपण प्रक्रिया पाहिली तर जेव्हा सीबीटीची व्याजदर  वाढीला मंजुरी मिळते तेव्हा घेण्यात आलेल्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाची मंजुरीची आवश्यकता असते.

जेव्हा अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून अंतिम मंजुरी देण्यात येते तेव्हा हे व्याजदर गॅझेटमध्ये सूचित केले जातात. ही प्रक्रिया झाल्यानंतर व्याजाचे पैसे पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा होतात. म्हणजेच ही प्रक्रिया पाहिली तर पीएफ खातेधारकांना व्याजाच्या पैशांकरिता अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

 ईपीएफओला कसे मिळते आर्थिक उत्पन्न?

 खाजगी क्षेत्रामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी पीएफ ही एक सामाजिक सुरक्षा असते. सध्या संपूर्ण देशामध्ये सात कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. सध्या ईपीएफओकडे 13 लाख कोटी रुपये जमा आहेत व हा सर्व पैसा शेअर बाजारासह विविध ठिकाणी ईपीएफओ गुंतवत असते.

या गुंतवणुकीतून जे काही ईपीएफओ पैसे कमावते ते कमावलेले पैसे ग्राहकांना व्याजाच्या स्वरूपात परत करत असते. साधारणपणे ईपीएफओच्या माध्यमातून व्याजाचे पैसे ग्राहकांच्या खात्यामध्ये वर्षात दोनदा जमा केले जातात.

Ajay Patil