आर्थिक

Loan On FD: अचानक पैशांची गरज उद्भवली तर केलेल्या एफडीवर मिळेल कर्ज! काय आहेत या प्रकारच्या कर्जाचे नियम? वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

Loan On FD:- जेव्हा अचानकपणे पैशांची गरज निर्माण होते तेव्हा मोठी धावपळ उडताना आपल्याला दिसून येते. अशावेळी मित्र किंवा नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतले जातात किंवा पर्सनल लोन सारख्या कर्जाचा पर्याय अवलंबून पैशांची गरज पूर्ण केली जाते. याशिवाय कर्जाच्या दृष्टिकोनातून बघितले तर गोल्ड लोन हा पर्याय देखील यामध्ये अनेक जण वापरतात.

तसेच काही व्यक्ती खाजगी सावकारांकडून देखील कर्जरूपाने पैसे घेतात. या सगळ्या समस्येपासून जर वाचायचे असेल तर तुम्ही जर बँकेत मुदत ठेव केलेली असेल तर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही एफडीवर कर्ज घेतले तर त्याचे फायदे देखील मिळतात.

परंतु काहीअंशी तोटे देखील आपल्याला सहन करावे लागतात. या दृष्टिकोनातून या लेखात आपण एफडी परिपक्व होण्याआधी म्हणजेच कालावधी पूर्ण होण्याआधी जर एफडी तोडली तर तिचे तोटे व किती कर्ज एफडीवर मिळू शकते याबद्दलची महत्त्वाची माहिती घेऊ.

 एफडीवर कर्ज घेण्याचे नियम फायदे

1- एफडीवर किती कर्ज मिळू शकते?- तुम्ही जी काही एफडी केलेली आहे तिच्या मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जर तुम्ही एक लाख रुपयांची एफडी केली असेल तर तुम्हाला त्यावर 90 हजार रुपयांचे कर्ज मिळते. परंतु अशाप्रकारे जर तुम्ही एफडीवर कर्ज घेतले तर तुम्ही केलेल्या एफडीवर जे व्याज मिळते त्यापेक्षा कर्जावर एक ते दोन टक्क्यांपर्यंत जास्तीची व्याज द्यावे लागते.

2- घेतलेले कर्ज फेडले नाहीतर काय होते?- समजा एखाद्या व्यक्तीने मुदत ठेवीवर म्हणजेच एफडी वर कर्ज घेतले आणि त्याची परतफेड केली नाही तर केलेली एफडी जेव्हा परिपक्व होते म्हणजे तिची मुदत पूर्ण होते तेव्हा बँक त्यातून कर्जाची थकबाकी कट करते व तुमचे राहिलेले शिल्लक पैसे तुम्हाला परत करते.

3- पैशांची गरज भागवण्यासाठी एफडीवर कर्ज घ्यावे की एफडी मोडावी समजा तुम्ही एक लाख रुपयांची एफडी केली असेल व तुम्हाला पन्नास हजार रूपयांची गरज असेल तर तुम्ही अशावेळी एफडीवर कर्ज घेणे खूप फायद्याचे ठरते.

कारण यामध्ये तुमची बचत देखील होत राहते व तुमच्या पैशांची अर्जंट गरज देखील पूर्ण व्हायला मदत होते. परंतु जर तुम्हाला एफडी ची संपूर्ण रक्कमच हवी असेल तर एफडी वेळेपूर्वी तोडणे कधीही फायद्याचे ठरते. यामध्ये तुम्हाला जे काही पैसे मिळतात त्यावर थोडासा दंड आकारला जातो परंतु तुमचे पैशांची गरज पूर्ण होते.

 कोणती बँक एफडीवर किती देते कर्ज किती आकारते व्याजदर?

1- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया एफडीवर जमा रकमेच्या 90% पर्यंत कर्ज देते व यावर एफडीचा व्याजदर प्लस त्यावर एक टक्के अधिक व्याजदर आकारला जातो.

2- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक एफडी वर 90% पर्यंत कर्ज देते व व्याजदर हा एफडीवर मिळणारा व्याजदर अधिक दोन टक्के व्याजदर आकारते.

3- ॲक्सिस बँक ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून एफडीच्या 25% पर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळते व या कर्जावर एफडी दर अधिक दोन टक्याचा व्याजदर आकारला जातो.

4- बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून एफडीच्या 90% पर्यंत रक्कम कर्ज स्वरूपात मिळते व एफडी

चा दर अधिक एक ते दोन टक्के व्याजदर आकारला जातो.

मुदतीआधी एफडी खंडित केली किंवा मोडली तर काय नुकसान होते?

जर एफडीची मुदत संपण्या अगोदर तुम्ही एफडी तोडत असाल तर ज्या व्याजदराने तुम्ही एफडी केलेली आहे त्या दराने तुम्हाला व्याज मिळत नाही. साधारणपणे यामध्ये एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा  एक टक्के कमी व्याज मिळते.

तसेच जर आपण एसबीआयचे नियम पाहिले तर त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने पाच लाख रुपये पर्यंतची एफडी केली आहे व ती मुदत पूर्ण होण्याआधी तोडली तर त्याला 0.50 टक्क्यांचा दंड देखील भरावा लागतो. म्हणजेच पाच लाखापेक्षा जास्त आणि एक कोटी रुपयापेक्षा कमी एफडी असेल आणि मुदतीपूर्वी ती तोडली तर एक टक्के दंड भरावा लागतो.

Ajay Patil