आर्थिक

Home Loan Tips: पैशांची आवक वाढल्यानंतर होमलोन फेडावे की पैसे इतर ठिकाणी गुंतवावे? कोणत्या पर्यायाने मिळेल तुम्हाला जास्त फायदा?

Published by
Ajay Patil

Home Loan Tips:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करणे आताच्या कालावधीमध्ये पाहिजे तितके सोपे नाही आणि अवघडही नाही. घर खरेदी करण्यासाठी आता अनेक बँकांच्या माध्यमातून होमलोन उपलब्ध करून दिले जाते व बँकांच्या अटी पूर्ण केल्या तर सहजासहजी होम लोन मिळते व त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करता येते.

परंतु होमलोन पाहिले तर त्याचा परतफेडचा कालावधी खूप मोठा असल्याने आपल्याला कित्येक वर्षापर्यंत त्याचे हप्ते भरावे लागतात. बऱ्याचदा आपली महिन्याची आर्थिक घडी देखील यामुळे विस्कटते.परंतु होमलोन फेडत असताना जर अचानकपणे पगारांमध्ये वाढ झाली किंवा कुठून आपले उत्पन्न वाढले तर आपण आपला जो काही कर्जाचा हप्ता आहे त्या व्यतिरिक्त कर्ज खात्यामध्ये अधिकची रक्कम भरू शकतो.

परंतु एक प्रश्न असा होतो की अशी वाढलेली रक्कम आपल्या जवळ आली तर आपण ती कर्ज परतफेडीसाठी वापरावी की इतर कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी? यासंबंधीचेच माहिती आपण बघू

 अशाप्रसंगी पैशांची गुंतवणूक कराल की कर्ज परतफेड कराल?

समजा काही मार्गांनी किंवा तुमच्या पगारांमध्ये वाढ झाली तर तुमचे उत्पन्न वाढते. मग अशा वेळी तुमची वाढलेली रक्कम कर्ज परतफेडीसाठी वापरली तर त्याचा फायदा असा असतो की तुमचे कर्ज मुदतीपेक्षा लवकर संपते. कर्ज लवकर संपले आणि साहजिकच त्यावर जे व्याज द्यावे लागते ते देखील आपल्याला कमी बसते.

आपल्याकडे जी रक्कम आलेली आहे त्या माध्यमातून जर संपूर्ण होम लोन फेडण्यात आपण यशस्वी झालो तर आपण कर्जमुक्त झाल्याचे समाधान आपल्याला मिळते. त्यामुळे दर महिन्याला हप्ता भरण्याच्या काळजीतुन आपली मुक्तता होते व ती रक्कम आपली दर महिन्याला वाचते.

त्यामुळे हप्ते भरण्यासाठी आपल्याला दर महिन्याला जी काटकसर करावी लागत होती ती आता करावी लागणार नाही व आपण आता सढळ हाताने खर्च करू शकतो. परंतु हातात आलेली रक्कम तुम्ही भविष्यातील आर्थिक गरजांसाठी गुंतवणे देखील महत्त्वाचे ठरते.

 गुंतवणूक केल्याचे फायदे

याव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्न आले तर तुम्ही कर्जाची परतफेड न करता उपलब्ध झालेल्या रकमेची गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदे मिळू शकतात. समजा सध्या जर आपण बघितले तर होम फायनान्स कंपनी किंवा बँकांचे होम लोन साठीचे जे व्याजदर साधारणपणे साडेनऊ ते दहा टक्क्यांच्या आसपास आहेत.

अशा प्रसंगी जर तुम्ही थोडी जोखीम घेण्याची हिंमत ठेवली व शेअर्स किंवा म्युच्युअल फंड किंवा इतर पर्यायामध्ये दीर्घ कालावधीसाठी एक रकमी अथवा नियमित गुंतवणूक केली तर 12 ते 13 टक्के रिटर्न मिळवता येणे शक्य आहे. याउलट आपण जर कर्जाची परतफेड केली तर आपल्याला होम लोन वर जे साडेनऊ ते दहा टक्के व्याज द्यावे लागते ते वाचते.

परंतु अशा पद्धतीच्या गुंतवणुकीतून जे तीन ते साडेतीन टक्के अतिरिक्त व्याज मिळते त्या फरकामुळे अंतिम शिल्लक रक्कम द्याव्या लागणाऱ्या व्याजापेक्षा निश्चित जास्त असते. दुसरा म्हणजे होम लोन परतफेडीचा प्राप्तीकर वाचवण्यासाठी जो उपयोग होतो तो कर्जाची रक्कम जर तुम्ही मुदतीपूर्वी पडली तर मिळत नाही.

त्यामुळे तुम्ही नियमित कर्ज फेड करणे सुरू ठेवून उपलब्ध झालेली जास्तीचे रक्कम जर थोडीशी जोखीम घेऊन योग्य त्या ठिकाणी गुंतवली तर कर्ज फेडत असताना गुंतवणूक देखील होत राहते व कर्जफेडीची मुदत संपताना आपण कर्जमुक्त तर होतो व शिवाय वेळोवेळी आपण जी गुंतवणूक करतो

व त्यामुळे जो काही परतावा मिळतो त्यामुळे चांगली रक्कम देखील आपल्याकडे शिल्लक म्हणून जमा होते. त्यामुळे तुमच्याकडे जर अशा प्रकारे जास्तीची रक्कम आली तर मुदतपूर्वी होमलोन परतफेड करावे की गुंतवणूक करावी हा निर्णय तुम्ही घेऊ शकतात.

Ajay Patil