Business Idea:- छोटा मोठा व्यवसाय करण्याची इच्छा असलेले अनेक जण आपल्याला दिसून येतात. व्यवसाय करायचा म्हटले म्हणजे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते असे नव्हे. तुम्ही मागणीनुसार अगदी घरातून देखील कमीत कमी खर्चात चांगला व्यवसाय उभारू शकतात आणि संपूर्ण जीवनभर त्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.
कमीत कमी गुंतवणुकीतून करता येणारे छोटेसे व्यवसाय पाहिले तर त्यांची भली मोठी यादी तयार होते. परंतु आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आणि त्या ठिकाणची गरज ओळखून तुम्ही व्यवसायाची निवड करून त्याला सुरुवात करणे व प्लॅनिंग बनवून त्या व्यवसायात वाढ करणे खूप गरजेचे असते.
अशा पद्धतीने तुम्ही कमी खर्चात चांगला पैसा मिळवण्याची आयुष्यभराची सोय करू शकता. यामुळे आपण या लेखात अशा काही व्यवसाय कल्पना म्हणजेच बिझनेस आयडिया बघणार आहोत जे तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करू शकतात.
कमी गुंतवणुकीत सुरू करा हे व्यवसाय आणि कमवा लाखोत
1- ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय– जर आपण गेल्या दहा ते पंधरा वर्षाचा विचार केला तर भारतामध्ये ट्रॅव्हल एजन्सीच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याची स्थिती आहे. लोकांची गरज आणि आवड ओळखून या क्षेत्रामध्ये ज्या युवकांना किंवा तरुणांना यायचे असेल त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही.
यामध्ये तुम्हाला ऑफिस करिता लागणारा खर्च देखील कमी होतो. तसेच यामध्ये काम करणाऱ्या सीएलआयए, एआरसी आणि आयएटीए सारख्या मोठ्या कंपन्या देखील तुम्हाला मदत करता व या कंपन्यांच्या माध्यमातून तुम्ही चांगले कमिशन देखील मिळवू शकता व तुमचा खर्च देखील कमी होतो. या कंपन्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमिशनचा दर कमी जास्त असतो.
2- घरगुती क्लास– ट्युशन क्लासेस हा एक शून्य गुंतवणूक असलेला उद्योग आहे. यामध्ये फक्त तुम्हाला जर ट्युशन घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमचे जाहिरात योग्य प्रकारे व जास्त प्रमाणामध्ये करणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही जास्तीत जास्त जाहिरात पर्यायांचा शोध घ्यावा व त्यातील लोकल जाहिरातीचे पर्याय शोधून त्यांना लोकांपर्यंत पोहोचवावे.
3- शिवणकाम– आपण पुणे किंवा नाशिक सारख्या मोठ्या शहरांचा विचार केला तर आता बदलता काळ आणि मागणी यानुसार प्रत्यक्षपणे शिवणकाम करणाऱ्या टेलरची मागणी वाढत आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी मात्र तुम्हाला जागेची गरज भासते. तसेच शिलाई मशीन व काजे बटन करणाऱ्या मशीनची आवश्यकता भासते व त्याकरता तुम्हाला गुंतवणूक लागते. त्यामुळे हा व्यवसाय देखील तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
4- ऑनलाइन फिटनेस इन्स्ट्रक्टर– आज-काल सगळ्यांना फिट अँड फाईन रहायला आवडते. परंतु कामाच्या दगदगीमध्ये प्रत्येक व्यक्तीला जिम मध्ये जाता येईल असे नव्हे व यातूनच ऑनलाइन फिटनेस इन्स्ट्रक्टर ही संकल्पना पुढे आली. फिटनेस चा अभ्यास ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा उद्योग खूप चांगला पर्याय आहे.
आपल्या घरी येऊन एखाद्या फिटनेस ट्रेनर ने आपल्याला ट्रेन करणे ही प्रत्येकालाच आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकतो. त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचण्याकरिता फक्त ऑनलाईन प्रेझेन्स खूप भक्कम असणे गरजेचे आहे. त्यामुळे वेबसाईट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत स्वतःला लोकांसमोर ठेवता यायला हवं. या व्यवसायात जिमसाठी लागणारे सामग्री आणि जागेसाठी गुंतवणूक करावी लागत नाही व त्यामुळे गुंतवणूक कमी होते.
5- इव्हेंट ऑर्गनायझर– इव्हेंट ऑर्गनायझरचा विचार केला तर हा कायम लोकांना भेटी देत असतो.तसेच विविध ठिकाणी जागांना भेटी देणे, वेगवेगळ्या स्पॉन्सर्स ना भेटणे तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमाचे वेळापत्रक बनवणे यामध्ये तो कायम बिझी असतो. एकंदरीत पाहिले तर इव्हेंट ऑर्गनायझर हा 24 तास बाहेरच असतो
व त्यामुळे त्याला स्वतःचा ब्रँडला मोठा करण्याकरिता चांगली ऑनलाइन स्ट्रॅटेजी आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्टार्टअप करिता खूप कमीत कमी गुंतवणूक करावी लागते. यामध्ये जागेचे भाडे वाचते व सर्व काम हे एका क्लिकवर होत असते. त्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून योग्य प्लॅनिंगने खूप सारा पैसा मिळवता येऊ शकतो.