BOB Fd Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर बरेचजण मुदत ठेव योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात. कारण मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणुकीचा परतावा हा चांगला मिळतोच परंतु गुंतवणुकीची सुरक्षितता देखील या माध्यमातून आपल्याला मिळत असते.
त्यामुळे बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी योजनांमध्ये अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. त्यामध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये जर तुम्ही मुदत ठेव म्हणजेच एफडी केली तर यावर प्रत्येक बँकांचे वेगवेगळे व्याजदर आहेत.
या अनुषंगाने जर आपण बँक ऑफ बडोदाचा विचार केला तर या बँकेने एक विशेष नवीन एफडी योजना सुरू केली असून तुम्ही या योजनेअंतर्गत जर एफडी केली तर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त व्याजाचा लाभ मिळू शकतो. बँकेच्या माध्यमातून ही योजना 15 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे.
कसे आहे बँक ऑफ बडोदाच्या विशेष एफडी योजनेचे स्वरूप?
बँक ऑफ बडोदाची ही विशेष एफडी योजना सामान्य आणि जेष्ठ नागरीकांसाठी राबविण्यात येत असून यामध्ये सामान्य नागरिकांनी जर एफडी केली तर 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% इतके व्याज मिळत आहे.
ही योजना 360 दिवसांसाठी असून यामध्ये तुम्ही किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतात तर जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांची देखील यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.
किती दिवसाच्या एफडीसाठी किती मिळेल व्याज?
1-सात दिवस ते 14 दिवसांच्या एफडी करिता सामान्य नागरिकांना 4.25% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.75 टक्के व्याजदर दिला जातो.
2- पंधरा दिवस ते 45 दिवसाच्या एफडी करिता सामान्य नागरिकांना 4.50% तर ज्येष्ठ नागरिकांना पाच टक्के इतका व्याजदर मिळतो.
3- 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांकरिता 5.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 6% इतका व्याजदर दिला जात आहे.
4- 91 दिवस ते 180 दिवस एफडी करिता सामान्य नागरिकांसाठी 5.6% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.10% इतका व्याजदर मिळतो.
5- 181 दिवस ते 210 दिवस एफडी करिता– सामान्य नागरिकांसाठी 5.75% तर जेष्ठ नागरिकांकरिता 6.25% इतका व्याजदर दिला जात आहे.
6- 211 दिवस ते 270 दिवस एफडी करिता– सामान्य नागरिकांना 6.15% तर जेष्ठ नागरिकांसाठी 6.65% इतकी व्याजदर मिळत आहे.
7- 271 दिवस आणि त्याहून अधिक आणि एक वर्षापेक्षा कमी एफडीकरिता सामान्य नागरिकांसाठी 6.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांकरिता 6.75 टक्के इतका व्याजदर मिळत आहे.
8- एक वर्ष कालावधीची एफडीकरता सामान्य नागरिकांना 6.85% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.35% इतका व्याजदर दिला जात आहे.
9-1 वर्ष ते 400 दिवसांपेक्षा जास्त एफडीकरता सामान्य नागरिकांना 6.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याजदर मिळत आहे.
10- चारशे दिवसांपेक्षा जास्त आणि दोन वर्षापर्यंत एफडीकरिता सामान्य नागरिकांकरिता 6.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25 टक्के इतका व्याजदर दिला जातो.
11- दोन वर्षापेक्षा जास्त आणि तीन वर्षापर्यंत एफडीकरिता सामान्य नागरिकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के इतका व्याजदर मिळत आहे.
12- तीन वर्षापेक्षा जास्त आणि पाच वर्षापर्यंत एफडीकरिता सामान्य नागरिकांना 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 7% इतका व्याजदर दिला जात आहे.
13- पाच वर्ष ते दहा वर्षापेक्षा जास्त एफडीकरिता सामान्य नागरिकांसाठी 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांकरिता सात टक्के इतका व्याजदर दिला जात आहे.
14- दहा वर्षावरील एफडीकरिता
सामान्य नागरिकांकरिता 6.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के इतका व्याजदर मिळत आहे.15- 399 दिवस( बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट योजना) एफडीकरिता सामान्य नागरिकांना 7.16% तर जेष्ठ नागरिकांना 7.65% इतका व्याजदर मिळत आहे.