Categories: आर्थिक

Business Success Story: तुम्हाला माहिती आहे का बिसलेरीचा 7000 कोटी पर्यंतचा प्रवास कसा झाला? वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

Business Success Story:-जेव्हाही आपण बाहेर कुठे जात असतो तेव्हा पिण्यासाठी मिनरल वॉटरची बॉटल विकत घेतो. परंतु जेव्हा आपण दुकानावर पाण्याच्या बाटलीचे मागणी करतो तेव्हा आपल्या तोंडून साहजिकच बिसलेरीची बाटली आहे का हे तोंडात येत असते.

बिसलरी व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही ब्रँडची किंवा कुठल्याही कंपनीची जरी पाणी बॉटल विकत घेतली तरी देखील आपण मागताना मात्र बिसलेरी  हा शब्द प्रामुख्याने वापरतो. कारण बिसलेरी हा ब्रँड मिनरल वॉटर क्षेत्रामधील खूप जुना आणि प्रसिद्ध असा ब्रँड असून मिनरल वॉटर उद्योगांमध्ये बिसलरी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

आज भारतातील प्रत्येक हॉटेल असो किंवा भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला बिसलेरीची विक्री मोठ्या प्रमाणावर दिसून येते व ग्राहक देखील बिसलेरीची  मागणी मोठ्या प्रमाणावर आज देखील करत असतात. इतका मोठ्या प्रमाणावर हा ब्रँड भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.

साधारणपणे 1965 या वर्षापासून माणसाची पाण्याची गरज बिसलेरी पूर्ण करत असून हा एक इटालियन ब्रँड होता परंतु तो एका भारतीय व्यक्तीने विकत घेतला व त्याचा विकास केलेला आहे. या लेखामध्ये नेमके हे यशस्वी भारतीय उद्योजक कोण आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

 बिसलेरीचा व्यवसाय भारतामध्ये प्रसिद्ध कोणी केला?

 बिसलेरी इटालियन ब्रँड असून एका भारतीय उद्योजकाने ते विकत घेतली व त्या बिस्करीच्या बाटल्या विकून कोट्यावधीचे साम्राज्य उभारले आहे. बिसलेरी भारतामध्ये प्रसिद्ध करण्यामागे जर कोणते कुटुंब असेल तर ते आहे चौहान कुटुंब होय.

या कुटुंबातील रमेश चौहान हे संपूर्ण बिसलेरीचे कमान सांभाळत होते. आज जर आपण याबाबत माहिती घेतली तर बिसलेरीचे नेतृत्व त्यांची एकुलती मुलगी जयंती या पाहत आहेत.

साधारणपणे रमेश चौहान यांनी 1969 मध्ये बिसलेरी  व्यवसायाला सुरुवात केली व  भारतीयांची जी काही शुद्ध पाण्याची गरज होती ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरले.

 रमेश चौहान यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण

 त्यांचा जन्म साधारणपणे 1940 मध्ये मुंबईत झाला व त्यांनी शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंट अशा दोन महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये पदव्या घेऊन पूर्ण केले. एवढेच नाही तर त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केले.

त्यानंतर त्यांचे वय 22 वर्षे असताना ते भारतात आले. अवघ्या 27 व्या वर्षी त्यांनी मिनरल वॉटर भारतीय बाजारपेठेमध्ये आणले. 1969 मध्ये पार्ले एक्सपोर्ट ने इटालियन उद्योजकाकडून बिसलेरी खरेदी केली व भारतामध्ये पाण्याच्या विक्रीला सुरुवात झाली.

त्यानंतर मात्र रमेश यांच्या नेतृत्वाखाली बिसलेरी हे मिनरल वॉटरचा एक प्रसिद्ध आणि समानार्थी शब्द बनला. त्यांच्या 52 वर्षाच्या संपूर्ण कारकर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले व या व्यवसायाचा विस्तार केला.

त्यांनी बिसलेरीच नाही तर त्यासोबत गोल्ड स्पॉट, sitra तसेच माझा आणि लिमका, थम्सअप सारखे ब्रँड देखील भारतीय बाजारपेठेमध्ये आणले व पाहता पाहता ते ग्राहकांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाले. एवढेच नाही तर 2016 मध्ये त्यांनी चार फ्लेवर्स मध्ये बिसलेरी पीओपी देखील लॉन्च केले.

पंचवीस वर्षानंतर बिसलेरीची संपूर्ण सूत्रे रमेश यांच्या हाती येताच त्यांच्या या व्यवसायात झपाट्याने वाढ झाली. आज जर आपण या कंपनीचे व्हॅल्युएशन पाहिले तर ते 7000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या त्यांच्या या कंपनीची सगळी कमान त्यांची एकुलती मुलगी जयंती चौहान या सांभाळत आहेत.

Ajay Patil