आर्थिक

Bank Interest Rate: सर्वात कमी व्याजदरात मिळणाऱ्या पर्सनल लोनच्या शोधात आहात का? ‘या’ बँका देतात कमी व्याजदरात कर्ज! वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Bank Interest Rate:- जेव्हा अचानकपणे आपल्याला पैशांची गरज भासते तेव्हा आपण मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून उसनवारीने पैसे घेण्याचा पर्याय अवलंबतो. तसेच दुसरा पर्याय जर पाहिला तर अनेक जण बँकांमध्ये वैयक्तिक अर्थात पर्सनल लोनसाठी अर्ज करतात.

परंतु बँकांचा विचार केला तर बँकांच्या माध्यमातून आपण जे काही कर्ज घेतो त्यावर व्याजदर आकारला जातो. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या कर्जाच्या परतफेडीवर व्याजदराचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. यामध्ये अनेक बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्याजदर आकारला जात

असल्याने आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेच जण कर्जाची मागणी किंवा कर्जाच्या शोधात असतातच परंतु अशी बँक पाहतात की त्या बँकांच्या माध्यमातून कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळेल.

याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही महत्त्वाच्या बँकांची माहिती घेणार आहोत जे ग्राहकांना परवडणाऱ्या दरामध्ये पर्सनल लोन देतात.

 या आहेत सर्वात कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या बँका

1- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील अग्रगण्य बँक असून या बँकेच्या माध्यमातून 11.15 टक्के प्रास्ताविक दराने तुम्ही वीस लाख रुपयापर्यंतचे पर्सनल लोन घेऊ शकतात.

2- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून तुम्हाला ४० लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन मिळू शकते व 40 लाख रुपयांपर्यंतच्या या कर्जावर तीन ते बहात्तर महिन्याच्या कालावधी करिता 10.75% ते 24% पर्यंत व्याजदर आकारला जातो. एचडीएफसी बँकेकडून कर्जावर प्रोसेसिंग फी देखील आकारली जाते व ती साधारणपणे 4999 रुपये इतकी असते.

3- कोटक महिंद्रा बँक तुम्हाला जर पर्सनल लोन हवे असेल तर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचा देखील पर्याय निवडू शकतात. ही बँक पन्नास हजार ते 40 लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज देते व या कर्जाच्या रकमेकरिता साधारणपणे 10.99 टक्के दराने व्याजदर आकारते. तसेच कर्ज रकमेच्या तीन टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून देणे गरजेचे असते.

4- आयसीआयसीआय बँक आयसीआयसी बँकेच्या माध्यमातून तुम्ही 10.65 टक्के ते 16 टक्के व्याजदराने कर्ज घेऊ शकतात. याशिवाय ग्राहकांना एकूण कर्जाच्या अडीच टक्के रक्कम ही प्रक्रिया शुल्क म्हणून भरणे गरजेचे असते.

5- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बँक असून ही बँक 12.75 ते 17.25 टक्के इतका व्याजदर आकारते.

Ajay Patil