बरेच व्यक्ती घर किंवा फ्लॅट खरेदी करतात व त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून कालांतराने असा फ्लॅट किंवा घर भाड्याने एखाद्या व्यक्तीला देतात. या माध्यमातून घरमालकाला मासिक आधारावर एक ठराविक उत्पन्न मिळत असते.
तसेच आयकराच्या दृष्टिकोनातून बघितले तर बरेच आयकरदाते भाड्याच्या घरातून जे काही उत्पन्न मिळते ते व्यवसायाचा किंवा व्यवसायामधील नफा म्हणून आयकर भरताना दाखवतात व त्यामुळे त्यांचा कर कमी होतो.
परंतु आता असे करता येणार नाही. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा आयकर दात्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परंतु यामध्ये घर किंवा दुकाने भाड्याने देणाऱ्या व्यक्तींकरिता बजेटमध्ये एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमचे घर किंवा दुकान एखाद्याला भाड्याने दिले असेल तर हा नवीन नियम तुम्हाला माहित असणे तितकेच गरजेचे आहे.
घर किंवा फ्लॅट भाड्याने दिला असेल तर हा नवीन नियम वाचा
मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला व तेव्हा या अर्थसंकल्पाचे वाचन करताना इन्कम टॅक्स बाबत त्यांनी एक महत्त्वाचा उल्लेख केला. हा उल्लेख करत असताना त्यांनी म्हटले की, निवासी मालमत्ता भाड्याने दिल्याने जे काही उत्पन्न मिळते हे व्यवसाय आणि व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा गृह संपत्ती उत्पन्न या अंतर्गत दाखवावे.
बरेच आयकर दाते भाड्याच्या घरातून जे काही उत्पन्न मिळते ते व्यवसायाचा किंवा व्यवसायातील नफा म्हणून दाखवतात व त्यामुळे त्यांचा कर कमी होतो असं देखील त्यांनी म्हटले. ही तरतूद काही मालमत्ता धारकांना भाड्याचे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न म्हणून दाखवण्याची परवानगी देते.
यामुळे देखभाल तसेच देखभाली वरील खर्च व दुरुस्ती यामध्ये कपातीचा दावा करता येऊ शकतो. अशाप्रकारे उत्पन्नाचा चुकीचा अहवाल देऊन आयकर दाते त्यांचे करपात्र उत्पन्न कमी करतात व त्यामुळे त्यांना कमी कर भरावा लागतो. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये स्पष्टपणे सांगितले की, केंद्र सरकार कलम 28 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडणार असून या प्रस्तावानंतर मात्र करदात्याला भाड्याचे उत्पन्न व्यवसाय उत्पन्न म्हणून आता दाखवता येणार नाही.
व्यवसाय किंवा घराचे मालमत्ता मिळकत आयकर अंतर्गत आता देय असेल व त्यामुळे आता या नवीन नियमामुळे करदायित्व वाढण्याची शक्यता आहे. तसेच ही दुरुस्ती पुढील आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे आता आयकर दात्यांना चुकीच्या उत्पन्नाच्या नावाखाली कर कमी करण्यापासून रोखता येणार आहे.
म्हणजेच आता या नवीन नियमानुसार घर भाड्याने देऊन जे उत्पन्न मिळते ते आता आयकर भरताना गृहनिर्माण मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये समाविष्ट करावे लागणार आहे व आता हे व्यवसायाचे उत्पन्न म्हणून दाखवता येणार नाही. त्यामुळे व्यवसायाचे उत्पन्न म्हणून जो काही कर कमी करता येत होता तो आता करता येणार नाही.