Loan Information:- अनेक कारणांमुळे आपल्याला जीवनामध्ये अचानकपणे पैशांची तातडीने गरज होती व अशा प्रकारची गरज भागवण्यासाठी जितका पैसा आवश्यक असतो तितका आपल्याकडे असेलच असे होत नाही. त्यामुळेच आपण कर्जाचा पर्याय अवलंबतो व कर्ज पर्याया पैकी कुठल्याही एका पर्यायाच्या माध्यमातून कर्ज मिळवून आपली पैशांची गरज पूर्ण करतो.
कर्ज घेणे हा पर्याय तातडीची गरज भागवण्यासाठी फायद्याचा असतो. परंतु यामध्ये तुम्ही कोणत्या मार्गाने कर्ज मिळवत आहात किंवा कोणत्या प्रकारचे कर्ज घेत आहात? याचा थेट परिणाम हा तुमच्या भविष्यकालीन आर्थिक परिस्थितीवर होणारा असतो.
आता खर्चाचे भरपूर प्रकार असतात व यामध्ये प्रामुख्याने पर्सनल लोन तसेच गोल्ड लोन सारखे पर्याय वापरले जातात. अनुषंगाने आपण या लेखामध्ये कोणत्या प्रकारचे कर्ज हे तातडीची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी फायद्याचे ठरते? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.
त्वरित पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी प्रकारचे कर्ज ठरते फायद्याचे?
1- गोल्ड लोन– सध्या जर आपण सोन्याचे दर पाहिले तर ते उच्चांकी पातळीवर असून साधारणपणे 75 हजार रुपये तोळा म्हणजेच दहा ग्रॅम इतके सोन्याचे दर आहेत. त्यामुळे अशा कालावधीमध्ये सोनेतारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन हे फायद्याचे ठरताना दिसून येत आहे.
तुम्ही जर आता सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घ्यायला गेलात तर पूर्वीपेक्षा त्यावर तुम्हाला जास्त कर्ज मिळेल. दुसरा फायदा म्हणजे पर्सनल लोनच्या तुलनेमध्ये गोल्ड लोन वर व्याजदर कमी आकारला जातो व तो साधारणपणे दहा ते बारा टक्क्यांपर्यंत असतो. त्यामध्ये जर तुम्ही गोल्ड लोन घेतले असेल व त्याची परतफेड केली नाही तर तुमचे सोने जप्त केले जाऊ शकते किंवा अतिरिक्त शुल्क तुम्हाला लागू होऊ शकते.
2- पर्सनल लोन– हा प्रकार बहुतांशी गरजे वेळी वापरला जातो. परंतु असा लोनवर सतरा ते अठरा टक्के व्याजदर द्यावा लागतो. तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
परंतु त्याची परतफेड त्वरित करणे देखील तेवढेच गरजेचे असते. परंतु यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे टाळावे. कारण क्रेडिट कार्डवर घेतल्या गेलेल्या कर्जावर वार्षिक 30 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त व्याज भरावे लागू शकते.
3- केलेल्या एफडीवर कर्ज– बऱ्याच जणांनी बँकेमध्ये एफडी केलेली असते. अशावेळी तुम्ही बँकेतील एफडी न मोडता त्यावर कर्ज घेऊ शकतात. यामागे तुमची एफडीच्या माध्यमातून केलेली बचत टिकून राहते. परंतु आवश्यक गरज भागवण्यासाठी रोकडा पैसा देखील मिळतो.
तुम्ही जर एफडीवर कर्ज घेतले तर त्याचा एकूण व्याजदर बारा ते पंधरा टक्के दरम्यान असतो व हा पर्सनल लोन पेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हाला सहजरीत्या उपलब्ध होते व जास्त कागदपत्र बँकेत देण्याची गरज देखील भासत नाही.
3- म्युच्युअल फंड कर्ज– म्युच्युअल फंडाचा वापर तुम्ही कर्जाकरिता एक सिक्युरिटी म्हणून करू शकतात व या पद्धतीने घेतल्या गेलेल्या कर्जाचा व्याजदर हा सध्या 12 ते 14 टक्क्यांपर्यंत आहे. यामध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक देखील कायम ठेवू शकतात आणि आवश्यक असलेली रोकड रक्कम देखील उपलब्ध करू शकतात.
परंतु हा प्रकार शेअर बाजारातील चढ उतारावर अवलंबून आहे व शेअर बाजारामध्ये चढ-उतार होत असतात व कर्जाची परतफेड होण्यापूर्वी म्युच्युअल फंड युनिटची किंमत कमी झाल्यास तुम्हाला कर्जाचे योग्य प्रमाण ठेवण्यासाठी अतिरिक्त युनिट विकणे गरजेचे राहते यामध्ये तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट डोक्यात ठेवूनच या प्रकारचे कर्ज घेणे गरजेचे आहे.