Refex Industries Share:-शेअर बाजारात काही कंपन्या अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतात. अशाच कंपन्यांपैकी एक म्हणजे रेफेक्स इंडस्ट्रीज. या कंपनीने अवघ्या १० वर्षांत २२,७६५% परतावा दिला आहे.ज्यामुळे गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळाला.
१० वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर अवघ्या २.०८ रुपयांना ट्रेड करत होता. मात्र, २७ जानेवारी २०२५ रोजी त्याचा भाव ४७५.६० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच जर कोणी ५० हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत १ कोटी रुपयांहून अधिक झाली असती.
गुंतवणुकीवरील परतावा
१० वर्षांत ५०,००० रुपये गुंतवले असते तर १ कोटी रुपये परतावा मिळाला असता. तसेच ५ वर्षांत ५०,००० रुपये गुंतवले असते तर आता २३ लाख रुपये परतावा मिळाला असता.
तिमाही निकाल आणि वाढ
२७ जानेवारी २०२५ रोजी रेफ्रेक्स इंडस्ट्रीजचे ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले व कंपनीने या कालावधीत १९६% अधिक नफा मिळवला. एक वर्षापूर्वी नफा १६.८९ कोटी रुपये होता व जो आता ५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.कंपनीचा एकत्रित महसूल १३४% वाढून ७१७.१२ कोटी रुपये झाला.डिसेंबर २०२३ मध्ये तो ३०५.९८ कोटी रुपये होता.
रेफेक्स इंडस्ट्रीज काय करते?
रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील रेफ्रिजरंट वायू (Refrigerant Gas) उत्पादक आणि वितरक आहे. ही कंपनी औद्योगिक रेफ्रिजरेशन करिता वापरल्या जाणाऱ्या गॅसचे उत्पादन करते आणि वितरित करते.कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप ₹६१०० कोटी आहे.डिसेंबर २०२४ अखेरीस ५३.४९% हिस्सा प्रवर्तकांकडे होता.
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?
रेफेक्स इंडस्ट्रीजने गेल्या काही वर्षांत मोठा परतावा दिला असला तरी भविष्यातील गुंतवणूक शेअरच्या हालचालींवर आणि कंपनीच्या वाढीच्या योजनांवर अवलंबून असेल. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.