Reliance Power Share : भारतीय उद्योगविश्वात अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर लिमिटेडने नवे नेतृत्व सादर करत मोठा बदल केला आहे. ऊर्जा प्रकल्पांमध्ये अग्रस्थानी असलेल्या या कंपनीने नीरज पारख यांना मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करून कंपनीच्या नेतृत्वात नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.
जागतिक आणि भारतीय ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्यांना सतत नवकल्पनांना प्रोत्साहन द्यावे लागते. अशा परिस्थितीत नीरज पारख यांचा 29 वर्षांचा व्यावसायिक अनुभव कंपनीला नवीन उंचीवर नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेत्रुत्वाखाली कंपनीच्या नूतनीकरणक्षम ऊर्जा उपक्रमांना आणखी बळ मिळेल.
कंपनीच्या या निर्णयामुळे शेअर बाजारात सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. रिलायन्स पॉवरचे शेअर्स 2% ने वाढून ₹41.60 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. गेल्या काही वर्षांत घसरणीचा अनुभव घेतलेल्या कंपनीसाठी हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
नीरज पारख यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे कंपनीच्या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता सुधारणा होईल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, अशी आशा आहे. कंपनीच्या या निर्णयाने रिलायन्स पॉवरसाठी नव्या युगाची सुरुवात झाली आहे.