Retirement Plans : SBI ची सुपरहिट योजना..! म्हातारपण आरामात घालवायचे असेल तर येथे करा गुंतवणूक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Retirement Plans : सध्याच्या युगात पेन्शन खूप महत्वाची आहे. महागाईच्या या दुनियेत जगण्यासाठी पैसे खूप महत्वाचे आहेत. म्हणूनच भविष्याच्या दृष्टीने आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे बनले आहे. जर तुम्हाला तुमचे पुढचे आयुष्य अगदी आरामात जगायचे असेल तर तुम्हाला असतापासून भविष्याचा विचार करून एका चांगल्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे.

पेन्शन योजना व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक मजबूत राहते आणि कशाचीही अडचण भासत नाही. आता जमा केलेले पैसे वृद्धापकाळात उपयोगी येतात, म्हणून योग्य पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. यामुळे पुढील आयुष्य मनासारखे जगता येते आणि कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. सध्या बाजारात विविध प्रकारच्या योजनाउपलब्ध आहेत ज्या अंतर्गत नियमित निवृत्ती वेतन मिळू शकते. यापैकी एक SBI योजना Annuity Deposit Scheme. आज आपण या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

या योजनेअंतर्गत, उत्पन्न म्हणजेच पेन्शनची रक्कम गुंतवणुकीवर अवलंबून असते. या अंतर्गत, गुंतवणूकदाराला एकरकमी गुंतवणुकीच्या बदल्यात दर महिन्याला ईएमआयच्या स्वरूपात उत्पन्न मिळते. पॉलिसीधारक त्यांच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकतात. नंतर, मुद्दल आणि व्याज दोन्ही मासिक वार्षिकी स्वरूपात परत केले जातात. याद्वारे आयुष्यभर पेन्शन मिळते.

योजनेची वैशिष्ट्ये :-

अ‍ॅन्युइटी डिपॉझिटचे विविध प्रकार आहेत. नियतकालिक वार्षिकी अंतर्गत, गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न मिळते. तुम्ही वार्षिक किंवा मासिक वार्षिकी पेआउट्सची निवड करू शकता. भारतातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. संयुक्त खाते उघडण्यासही परवानगी आहे. हे 3/5/7/10 वर्षांसाठी गुंतवले जाऊ शकते. यावर मुदत ठेवीचा दरही प्रभावी आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. या योजनेची खास गोष्ट म्हणजे कर्जाचा लाभ देखील उपलब्ध आहे. 5-10 वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज मिळते, सर्वसामान्य नागरिकांना 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याज मिळते.

जर या योजनेत एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात करते आणि दरमहा 500 रुपये जमा करते. यावर त्या व्यक्तीला ५.४% परतावा मिळतो. तर वयाच्या 60 व्या वर्षी, या व्यक्तीला दरमहा 1,432 रुपये पेन्शन मिळते. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितकी पेन्शनची रक्कम वाढेल.