Categories: आर्थिक

लय भारी ! मोबाईलवरून करा ‘ही’ सोप्पी कामे; गुगल देईल खूप सारे पैसे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-गुगल लवकरच भारतात टास्क मेट अ‍ॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने भारतात या अ‍ॅपची चाचणी सुरू केली आहे. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना स्मार्टफोनवर एक सिंपल टास्क पूर्ण करून पैसे मिळविण्याची संधी देईल.

टास्क मेट अ‍ॅप जगभरातील व्यवसायांद्वारे पोस्ट केलेली बरेच टास्क प्रदान करेल. यामध्ये रेस्टॉरंट्सची छायाचित्रे घेणे, सर्वेक्षणमधील प्रश्नांची उत्तरे देणे, इंग्रजीमधून दुसर्‍या भाषेत वाक्य अनुवाद करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. गूगल टास्क मेट अ‍ॅप सध्या बीटा मोडमध्ये आहे. सध्या याची टेस्टिंग सुरु आहे.

लोकल करेंसी मध्ये होईल पेमेंट:-  गुगल प्लेवरील अ‍ॅपच्या डिस्क्रिप्शन नुसार, टास्क मॅट app वरील टास्क पूर्ण केल्यानंतर वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानिक चलनात पैसे दिले जातील. टास्क दोन कॅटेगिरी मध्ये विभागली आहेत

– सिटिंग आणि फील्ड टास्क , परंतु Google वापरकर्त्यास कोणत्याही टास्क साठी थेट विचारू शकते. हा अ‍ॅप वापरण्यासाठी तीन स्टेप आहेत-

– आपल्या जवळचा टास्क शोधणे

– मिळकत सुरू करण्यासाठी टास्क पूर्ण करणे

– आपली कमाई कॅश आउट करणे टास्क मेट अ‍ॅपवर, यूजर पाहू शकतो कि त्याने किती टास्क पूर्ण केले आहेत, किती टास्क योग्यरित्या पूर्ण केली आहेत, यूजर लेव्हल काय आहे आणि कोणते टास्क रिव्यू मध्ये आहेत.

टास्क स्किपचा पर्याय :- युजर्सला एखाद्या कार्यासाठी कुठे जायचे असल्यास, Google टास्क मॅट अॅप युजर्सला तेथे पोहोचण्यास किती वेळ लागेल हे दर्शवेल. सध्या उपलब्ध असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, किंमत डॉलरमध्ये आहे, परंतु कदाचित भारतात जेव्हा लॉन्च होईल तेव्हा किंमत रुपयांत आणली जाईल . जर युजर्सला टास्कमध्ये रस नसल्यास किंवा ते करू इच्छित नसेल तर तो टास्क स्किप करू शकतो. टास्क कधीही, कोठेही पूर्ण केली जाऊ शकतो.

पैसे मिळविण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ?:-  अ‍ॅपच्या डिस्क्रिप्शननुसार युजर्सना टास्क मेट ऍपवरून कमाई मिळविण्यासाठी यूजरला थर्ड पार्टी प्रोसेसरला बँक खाते लिंक करावे लागेल. टास्कमधून मिळणारी कमाई कॅश आउट करण्यासाठी युजर्सने त्याचे ई-वॉलेट किंवा खात्याचा तपशील Google टास्क मेट ऍप मध्ये पेमेंट पार्टनरकडे नोंदवावा. आपल्या प्रोफाइल पेज वर जा आणि कॅश आउट पर्यायावर क्लिक करावे. यानंतर, यूजर लोकल करेंसीमध्ये आपली कमाई घेऊ शकेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24