आर्थिक

लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत

Published by
Ratnakar Ashok Patil

RVNL Share Price:- आज सुरुवातीला शेअर बाजारामध्ये जरी घसरण झाली तरी देखील मात्र काही कंपन्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये जर आपण रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी अर्थात RVNL च्या शेअरची स्थिती जर बघितली तर यामध्ये आज मजबूत तेजी दिसून आली.

तसे पाहायला गेले तर मागच्या पाच दिवसापासून या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 13.32% चा परतावा दिला आहे व आज 4.60% ची वाढ होऊन हा शेअर 430.05 रुपयांवर पोहोचला होता.

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमधील तेजीचे कारण काय?
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला अपडेट दिली व त्यामध्ये म्हटले की, “ नेटच्या मिडल माइल नेटवर्कच्या डेव्हलपमेंट(बांधकाम, मेंटेनन्स तसेच ऑपरेशन आणि अपग्रेड ) साठी डिझाईन करणे तसेच बिल्ड ऑपरेट आणि मेंटेन मॉडेलकरिता बीएसएनएलच्या माध्यमातून वर्क ऑर्डर मिळाली आहे व बीएसएनएल कडून मिळालेल्या या वर्क ऑर्डरचे मूल्य 9613.42 कोटी रुपये आहे.

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरबद्दल तज्ञांनी काय म्हटले?
या कंपनीच्या शेअरचा गेल्या सहा महिन्यातील परफॉर्मन्स बघितला तर त्यामध्ये 26.63 टक्क्यांनी घसरण झालेली आहे. तसेच 52 आठवड्यांचा उच्चांक जर बघितला तर तो 647 रुपयांचा आहे.परंतु आता 215 रुपयांनी हा शेअर स्वस्त आहे. तसेच हा शेअर 52 आठवड्यांच्या निचांकी 213 रुपयांच्या पातळीवरून 230 रुपयांवर पोहोचला आहे.

त्यामुळे गेल्या सहा महिन्यातील त्याची ही परिस्थिती पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार घसरणीमध्ये अधिक शेअर्स खरेदी करू शकतात असे तज्ञांनी म्हटले आहे.तसेच या कंपनीच्या शेअरचा टेक्निकल चार्ट जर बघितला तर त्यामध्ये या शेअरला जवळपास 390 ते 370 रुपयांच्या रेंजमध्ये सपोर्ट दिसून येत आहे.

यानुसार 450 रुपये हा या शेअर करीता एक मजबूत रेजिस्टन्स असल्याचे एंजल वनच्या ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी म्हटले आहे. इतकेच नाहीतर रॅलीगेअर ब्रोकिंग फर्मने देखील आरव्हीएनएलचा हा शेअर 430 रुपयांच्या वरच्या टार्गेटला जाऊ शकतो असे म्हटले आहे. तसेच गुंतवणूकदारांनी 390 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

Ratnakar Ashok Patil

Published by
Ratnakar Ashok Patil