Salary Hike:- भारतामध्ये ज्या प्रमाणामध्ये सरकारी विभागांमध्ये कर्मचारी काम करतात त्याच्या बरोबरीने खाजगी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची संख्या आहे. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये देखील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर भारतात काम करतात व त्यांच्या दृष्टिकोनातून देखील पगार वाढ हा महत्त्वाचा विषय असतो.
जर कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर गेल्या कित्येक दिवसापासून कंपनी कर्मचारी देखील पगार वाढीची वाट पाहत होते. त्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी समोर आली असून जवळपास देशातील सर्वच कंपन्यांमध्ये आता मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून भारतीय कंपन्या यावर्षी 12 टक्क्यांपर्यंत पगार वाढ देण्यास तयार असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. जर असं झाले तर नक्कीच कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 12 टक्क्यांपर्यंत वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बरेच कर्मचारी वाढीव पगाराची वाट पाहत होते व आता याकरिता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे व ती म्हणजे देशामध्ये पगारवाढीचा हंगाम सुरू झाला असून सर्वच कंपन्यांच्या माध्यमातून आवश्यक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच एका सर्वेक्षणातून माहिती समोर आली आहे की यावर्षी भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना बारा टक्क्यांपर्यंत पगार वाढ देण्यास तयार झाले आहेत.
मिंट अँड शाईनने केले सर्वेक्षण
हे सर्वेक्षण मिंट अँड शाईनने केले असून त्यानुसार यावर्षी कर्मचाऱ्यांना 9 ते 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. या झालेल्या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या 34% एचआर अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला मान्यता दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.
तसेच सुमारे 24% कर्मचाऱ्यांना दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वेतन वाढ अपेक्षित असून या सर्वेक्षणात सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांना 20 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. परंतु त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे अपेक्षा पूर्ण होताना मात्र दिसत नाही. झालेल्या या सर्वेक्षणाच्या अहवालात सुमारे 3000 एचआर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मते जाणून घेण्यात आली.
मेंट अँड शाईनने हे सर्वेक्षण जानेवारी ते मार्च दरम्यान केले होते व यामध्ये 49 टक्के भरती करणाऱ्यांनी सकारात्मक असे मूल्यांकनाबाबत मत दिले आहे. यानुसार 25% कंपन्यांमध्ये सहा ते आठ टक्क्यांपर्यंत पगार वाढ होऊ शकते व यासोबत वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बाबत देखील कंपन्या सकारात्मक आहेत.
पगारवाढी संबंधीचा अहवाल अशावेळी आला आहे की जेव्हा भारतीय कंपन्या नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करत आहेत व जगभरातील अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कर्मचारी कपातीच्या बातम्या देखील कानावर येत आहे.
तंत्रज्ञानाचा वापर तसेच जगात युद्धजन्य परिस्थिती आणि इतर कारणांमुळे स्टार्टअप तसेच आयटी आणि रिटेल उद्योगांमध्ये सध्या मंदीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कंपन्यांच्या माध्यमातून सरासरी 9.7% पगार वाढ करण्यात आलेली होती. या झालेल्या सर्वेक्षणात केवळ दोन टक्के कंपन्यांनी शून्य ते दोन टक्के पगार वाढ देणार असल्याचे सांगितले आहे.