आर्थिक

Cibil Score : पगार चांगलाय, पण सिबिल स्कोर मायनस आहे तरीही बँक लोन देणार का ? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Cibil Score : आपल्यापैकी अनेकांना संसाराच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. अनेक जण वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेतात. कोणाला गाडी खरेदी करायची असते, कोणाला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो, कोणाला टीव्ही खरेदी करायची असते, कोणी घरासाठी लोन काढत, तर कोणी पर्सनल म्हणजे वैयक्तिक कारणांसाठी पर्सनल लोन घेतात.

मात्र, बँकेकडून किंवा एनबीएफसी कडून कोणत्याही प्रकारचे लोन देतांना संबंधित व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक केला जातो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना लवकरात लवकर लोन मंजूर होते.

मात्र ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला नसतो त्यांना कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. किंवा अशा व्यक्तींना कर्ज भेटले तर त्यासाठी अधिकचा व्याजदर द्यावा लागतो. खरतर, सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो.

पण ज्या लोकांनी यापूर्वी कधीच कर्ज घेतलेले नसते किंवा त्यांचे क्रेडिट कार्ड देखील नसते अशा लोकांचा सिबिल स्कोर जनरेट होत नाही. अशा परिस्थितीत त्यांचा सिबिल मायनस मध्ये दाखवतो.

यामुळे जर सिबिल मायनस मध्ये असेल तर अशा लोकांना कर्ज मिळू शकते का ? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान याबाबत तज्ञ लोकांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीने कधीही कर्ज घेतलेले नसेल, तसेच अशा व्यक्तीने कधीही क्रेडिट कार्ड युज केलेले नसेल तर त्यांचा सिबिल स्कोर मायनस मध्ये जातो. अशा स्थितीत बँका अशा मायनस सिबिल स्कोर असलेल्या लोकांना कर्ज देताना काही इतर गोष्टींचा विचार करतात.

अशा प्रसंगी बँकांकडून सदर व्यक्तीचा उत्पन्नाचा सोर्स, कमाई आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिली जाते.अशा व्यक्तींना सॅलरी स्टेटस, बँक स्टेटमेंट किंवा विजेचे बिल यांसारखे पुरावे बँकेला दाखवावे लागू शकतात.

मात्र, अशा मायनस मध्ये सिबिल स्कोर असलेल्या लोकांना कर्ज द्यायचे की नाही हे सर्वस्वी बँकांवर अवलंबून असते. जर बँकेला सदर व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यास पात्र आहे असे वाटले तर बँका लोन मंजूर करतात.

तथापि जर बँकांनी सिबिल स्कोर मायनस असेल यामुळे कर्ज नाकारले असेल तर अशा व्यक्तींनी सिबिल स्कोर सुधारण्यासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड मागितले पाहिजे. क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर आणि क्रेडिट कार्डचे ईएमआय वेळेवर भरल्यानंतर सदर व्यक्ती आपला क्रेडिट स्कोर सुधारू शकतो.

Ahmednagarlive24 Office