आर्थिक

या शेतकऱ्याने तर कमालच केली! 13 किलो वाटाणे बियाण्याची लागवड केली व कमावले तब्बल 2 लाख 25 हजार

Published by
Ajay Patil

शेतकऱ्यांचा विचार केला तर आता परंपरागत पिकांची जागा आधुनिक अशा पिकांनी घेतलेली असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांनी लाखात उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, नेमका बाजारपेठेचा अभ्यास व त्या दृष्टिकोनातून केलेली लागवड फायदेशीर ठरते.

जर आपण पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा विचार केला तर  या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीताफळ आणि अंजीर या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील चांगली मागणी या ठिकाणच्या या पिकांना आहे. फळ पिकासोबत या ठिकाणी वाटाणा या पिकाची देखील भरघोस उत्पादन मिळते कारण  त्या ठिकाणचे हवामान आणि माती या पिकांसाठी खूप फायदेशीर असल्यामुळे उत्पादन चांगले येते.

आपण वाटाणा या पिकाचा विचार केला तर साधारणपणे पुरंदर तालुक्यात याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते व खरीप हंगामामध्ये जून ते सप्टेंबर मोठ्या प्रमाणावर देखील उत्पादन घेतले जाते. वाटाणा हे या ठिकाणचे प्रमुख पीक असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल प्रत्येक वर्षी बाजारपेठेमध्ये होत असते.

त्यामुळे या ठिकाणी वाटाणा पिकासाठी असणारे संपूर्ण ज्ञान शेतकऱ्यांना आहे. याच अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सम्राट जगताप या तरुण शेतकऱ्याने दुष्काळी पट्ट्यातील कोथळे या गावी एक एकर क्षेत्रावर 13 किलो वाटाण्याची बियाण्याची लागवड केली व याकरिता मल्चिंग पेपरचा वापर केला व भरघोस  असे उत्पादन मिळवले.

 13 किलो बियाण्यातून घेतले सव्वा दोन लाखाचे वाटाण्याचे उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सम्राट जगताप या तरुण शेतकऱ्याने कोथळे या ठिकाणी एक एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरचा वापर करून फक्त 13 किलो वाटाण्याची बियाण्याची लागवड केली व तब्बल 4700 किलो उत्पादन मिळवले. या उत्पादनातून त्यांना सव्वा दोन लाख रुपयांचा आर्थिक नफा झाला. यावर्षी पावसाची स्थिती तितकीशी समाधानकारक नसताना देखील त्यांचा वाटाण्याचा हा प्रयोग खूप यशस्वी झाला.

काही वर्षांपूर्वी कोथळे या गावांमध्ये त्यांनी एक एकर जमीन खरेदी केलेली आहे व एक एकर क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन उत्पादन मिळवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात.परंतु या वर्षी मात्र पावसाचा खंड असल्यामुळे पिकांची स्थिती दयनीय आहे व या परिस्थितीत वाटाण्याचे पीक चांगले येईल की नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. परंतु काहीही करून वाटाणा पिकाची लागवड करायची असे ठरवून त्यांनी हा प्रयोग केला.

त्यांनी वाटाणा  लागवड निश्चित करून त्यांनी एक एकर क्षेत्रावर वाटाणा पिकाचे उत्पादन घेतले व पेरणी करताना मात्र पारंपारिक पद्धत न वापरता गोल्डन जीएस 10  या वाणाची लागवड त्यांनी मल्चिंग पेपरच्या सहाय्याने केली. 13 किलो बियाणे प्रत्येकी सहा इंच अंतर ठेवून त्यांनी लावले व लागवडीकरिता चार फुट अंतरावर बेड तयार केली आणि त्यावर मल्चिंग पेपर अंथरून बियाण्याची लागवड केली. बियाण्याचे उगवण झाल्यानंतर ज्या पद्धतीने टोमॅटो पिकाला आधार देण्याकरिता काठ्याचा वापर केला जातो

अगदी त्याच पद्धतीने त्यांनी वाटाणा पिकासाठी बेडच्या बाजूने काठ्या जमिनीत रोवल्या व पिकाचे चांगले वाढवण्यासाठी ड्रीप पद्धतीने रासायनिक खतांचे नियोजन केले. कंपोस्ट खताचा देखील वापर केला. काठ्याच्या आधाराने वाटण्याची वाढ सुरू असताना त्याला जाड्या लावून त्या माध्यमातून वाटाण्याचे रोपटे वरच्या बाजूला नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला व या पद्धतीने नियोजन करून पहिला वाटाण्याच्या तोडा त्यांना 55 व्या दिवशी झाला.

यामध्ये त्यांना 1600 किलो वाटाण्याचे उत्पादन मिळाले व दुसऱ्या तोड्याला 100 तिसऱ्याला 700, चौथ्या तोड्याला पाचशे तर पाचव्या तोड्याला 250 किलो याप्रमाणे 4700 किलो वाटाणा उत्पादन त्यांना मिळाले व याची विक्री त्यांनी कमीत कमी 45 ते 65 रुपयांपर्यंत केली व या माध्यमातून सव्वा दोन लाखांचे उत्पन्न मिळवले.

विशेष म्हणजे त्यांनी केलेले व्यवस्थापन इतके उत्तम होते की साधारणपणे जर वाटाण्याची उंची पाहिली तर ते दोन ते अडीच फूट पर्यंत वाढते परंतु त्यांनी काठी आणि जाळीचा आधार दिल्यामुळे तब्बल चार ते साडेचार पर्यंत वाटाण्याचे झाड वाढले व साहजिकच त्यामुळे शेंगांचे प्रमाण देखील जास्त राहिले. झाड उंच वाढल्यामुळे हवा खेळती राहिली व रोगांचा प्रादुर्भाव देखील अत्यल्प राहिला व शेंगा देखील मोठ्या प्रमाणावर मिळाल्या.

अशा पद्धतीने उत्तम नियोजन करून वाटाण्याचे पीक घेतल्यामुळे सम्राट जगताप यांना लाखात उत्पादन मिळाले.

Ajay Patil