Interest On Saving Account : आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी लोक सामान्यपणे बचत खाती वापरतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कधीही पैसे जमा किंवा काढू शकता. बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवरही बँक तुम्हाला व्याज देते. बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर दिलेले व्याजदर सर्व बँकांमध्ये वेगवेगळे असतात.
काही बँका बचत खात्यातील शिल्लक रकमेनुसार ७ ते ८ टक्के व्याज देत आहेत. जे एफडी व्याजदरांपेक्षा जास्त आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बँकांबद्दल सांगत आहोत ज्या बचत खात्यांवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत.
बचत खात्यावर सार्वधिक व्याज देणाऱ्या बँका !
ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांमध्ये 10 कोटी आणि 2 कोटींपेक्षा कमी शिल्लक रकमेवर 7.5 टक्के व्याज देत आहे. बँक 50 लाख ते 2 कोटींपेक्षा कमी बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 7.25 टक्के व्याज आणि 5 कोटी ते 10 कोटींपेक्षा कमी शिल्लक रकमेवर 7 टक्के व्याज देत आहे.
DCB बँक
DCB बँक बचत खात्यावरील शिल्लक रकमेनुसार 7 ते 8 टक्के व्याज देते. ही बँक 10 कोटी आणि 200 कोटींपेक्षा कमी खात्यातील शिल्लक रकमेवर 8.00 टक्के व्याजदर देत आहे. हे व्याजदर 8 मे 2023 पासून लागू आहेत.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यावर ७.५ टक्के व्याज देत आहे. १ ऑगस्ट रोजी व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. 5 लाख ते 25 लाख रुपये शिल्लक असलेल्या खात्यांवर 7.25 टक्के कमाल व्याजदर उपलब्ध असेल. 25 लाख ते 50 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर 7.25 टक्के व्याज मिळेल. 50 लाख ते 2 कोटी रुपये शिल्लक असल्यास 7.5 टक्के व्याज मिळेल.
IDFC FIRST Bank
आयडीएफसी फर्स्ट बँक 10 लाखांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक वर 7% पर्यंत व्याज देत आहे. हे नवीन दर १ जुलै २०२३ पासून लागू झाले आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 5 लाख ते 2 कोटी रुपये शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर 7.00 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, 1 लाख ते 5 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर 6.75 टक्के व्याज उपलब्ध आहे.