SBI FD Scheme : SBI च्या विशेष योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; आजच करा गुंतवणूक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank Senior Citizens FD Scheme : जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि तुम्हाला कोणताही धोका पत्करायचा नसेल तर तुमच्याकडे गुंतवणुकीची उत्तम संधी आहे. SBI आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच चांगल्या योजना आणत असते, अशीच एक योजना म्हणजे SBI WeCare योजना एसबीआयने ही योजना ज्येष्ठ नागरिकांनसाठी सुरु केली होती, पण आता ही योजना लवकरच बंद होणार असून, तुमच्यासाठी गुंतवणुकीची शेवटची संधी आहे.

SBI ची ही योजना दीर्घ काळासाठी उत्तम योजना आहे, जर तुम्ही दीर्घ काळासाठी चांगली गुंतवणूक योजना शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. ही योजना वृद्धांना 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देत आहे. वृद्धांना या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. SBI ची ही योजना 30 सप्टेंबर 2023 रोजी बंद होत आहे. मात्र, अद्यापपर्यंत बँकेकडून तारीख वाढविण्याबाबत कोणताही संदेश आलेला नाही.

SBI WeCare योजना

ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या या विशेष FD योजनेत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. SBI ची ही योजना ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. या FD योजनेत किमान गुंतवणूक करून, तुम्ही 5 वर्षे आणि 10 वर्षांत जास्त परतावा मिळवू शकता. SBI WeCare FD वर 50bps चे अतिरिक्त व्याज म्हणजेच 0.50 टक्के उपलब्ध आहे. सध्या एसबीआयच्या या एफडी योजनेवर ७.५० टक्के दराने व्याज दिले जात आहे.

SBI FD चे नियमित व्याजदर

SBI चे नियमित FD व्याज दर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.50% आणि 7.50% दरम्यान असतात. आयकराच्या नियमांनुसार त्यात टीडीएस कापला जातो. आयटी नियमांनुसार कर कपातीतून सूट मिळण्यासाठी गुंतवणूकदार फॉर्म 15H/15G सबमिट करू शकतात. कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी SBI WeCare स्पेशल FD योजना एक पर्याय म्हणून सुरू करण्यात आली होती. ही FD योजना लोकांना सर्वाधिक व्याज देणारी FD योजना आहे.