SBI Home Loan:- स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाची जीवनामध्ये प्रमुख स्वप्न असते. यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करून प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. परंतु सध्या जागा आणि घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या समस्या निर्माण होतात.
काही केल्या घर घेण्यासाठी आर्थिक बजेट बसत नाही व बऱ्याच जणांचा यामुळे हिरमोड होतो. परंतु घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून मिळणारे होमलोन उत्तम पर्याय असून बँकांच्या माध्यमातून देखील आता मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सहजरीत्या होमलोन दिले जात असल्यामुळे हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे सोपे झालेले आहे.
परंतु जर होमलोन घेतले म्हणजे बँकेच्या माध्यमातून व्याज आकारण्यात येते व व्याज जर जास्त दराने असेल तर मात्र घेतलेले होमलोन आपल्याला खूप महाग पडते. होमलोनचा ईएमआय देखील आपल्याला जास्त भरावा लागतो.
त्यामुळे ज्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी व्याजदरात होमलोन मिळेल अशा बँकेतून होमलोन घेणे गरजेचे असते. याच अनुषंगाने तुम्हाला देखील होमलोन घेऊन घर घ्यायचे असेल तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
स्टेट बँकेने होमलोन वरील व्याजदर केले कमी
स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकताच ग्राहकांना मोठा दिलासा तिला असून ज्यांना घर घ्यायचे आहे अशा व्यक्तींकरिता आता एक महत्त्वाचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि होमलोन वरचा व्याजदर कमी केला असून कमी व्याजदराचा फायदा घेऊन तुम्ही घर खरेदी करू शकतात.
तुमचा सिबिल स्कोर जर उत्तम असेल तर तुम्हाला फक्त 8.40% व्याजदराने स्टेट बँक ऑफ इंडिया होमलोन देत आहे. तुम्ही आवश्यक अटी व शर्ती तसेच लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तर तुम्हाला ताबडतोब होम लोन मिळणे आता शक्य आहे.
परंतु जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज तर मिळेल. परंतु स्टेट बँकेच्या माध्यमातून व्याजदर अधिक आकारला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे कमी व्याज दरासोबत होमलोन वर लागणारे प्रोसेसिंग फी देखील आता स्टेट बँक ऑफ इंडिया घेत नसल्यामुळे हा देखील एक मोठा फायदा ठरणार आहे.
एसबीआय कडून होमलोन घेण्यासाठी कोणते लागतील कागदपत्रे?
एसबीआय कडून होमलोन घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे बँकेला देणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही व्यवसाय करत असाल तर मागचे तीन वर्ष आयटी रिटर्न भरल्याचे पुरावे,
व्यवसायाची तीन वर्षाची बॅलन्स शीट, व्यवसायातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट, व्यवसायाचे लायसन्स, टीडीएस सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्र बँकेला द्यावे लागतात.
या पद्धतीने तुम्हाला देखील होमलोन घेऊन घर खरेदी करण्याचा प्लॅनिंग असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधणे गरजेचे आहे व त्या ठिकाणाहून अधिक माहिती घेऊन अर्ज करू शकतात.