एसबीआयने लाँच केली नवीन FD योजना ! किती व्याजदर मिळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI New FD Scheme : एसबीआय अर्थातचं स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते.

या बँकेने आता एफडी करणाऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली आहे. खरंतर, अलीकडे भारतात FD करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे मुदत ठेवीवर असणारे व्याज आता वाढले आहे. अनेक बँका आता एफडीवर चांगले व्याज देत आहेत.

यामुळे आता एफडी करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. विशेष म्हणजे बँकेतील FD योजना ही सुरक्षित असते. यामुळे एफडी करण्याला विशेष पसंती मिळू लागली आहे. दरम्यान एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक नवीन FD स्कीम लाँच केली आहे.

एसबीआय ने ग्रीन एफडी अर्थातच ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट ही एफ डी योजना लाँच केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या FD मध्ये गुंतवलेले पैसे पर्यावरणाला चालना देणाऱ्या आणि भारताच्या हरित वित्त परिसंस्थेच्या भरभराटीला मदत करणाऱ्या प्रकल्पांमध्ये वापरले जाणार आहेत.

म्हणजेच गुंतवणूकदारांनी जर या योजनेत पैसा लावला तर त्यांना रिटर्न तर मिळणारच आहे शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांच्याकडून मोठी मदतही होणार आहे. निश्चितच ही समाजउपयोगी FD योजना ग्राहकांमध्ये लवकरच लोकप्रिय होईल आणि यामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला बळ लागेल, अशी आशा आता जाणकार लोकांनी देखील व्यक्त केली आहे.

एसबीआयच्या या नवीन एफडी योजनेत एन आर आय, निवासी भारतीय तसेच कंपनी देखील गुंतवणूक करू शकणार आहेत. या योजनेत 1111 दिवसांच्या कालावधीसाठी 1777 दिवसांच्या कालावधीसाठी आणि 2222 दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे.

सध्या स्थितीला या एफडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदारांना बँकेच्या ब्रांचला भेट द्यावी लागणार आहे. मात्र येत्या काही दिवसात ही एफ डी स्कीम योनो आणि इंटरनेट बँकिंग वर देखील उपलब्ध होईल आणि त्यानंतर मग गुंतवणूकदारांना तेथूनच या एफडी योजनेमध्ये गुंतवणूक करता येईल अशी माहिती समोर येत आहे. पण, SBI कडून ग्रीन रुपी FD वर मिळणारे व्याज हे सामान्य FD वर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा 0.10 टक्क्यांनी कमी राहणार आहे.