SBI Loan Offer : कोणत्याही प्रोसेसिंग फीशिवाय 20 लाख रुपयांचे कर्ज, बघा SBIची खास ऑफर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Loan Offer : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने पगारदार वर्गासाठी वैयक्तिक कर्जावर एक उत्तम ऑफर आणली आहे, या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार आहे. बँक सध्या प्रक्रिया शुल्कावर सूट देत आहे. या व्यक्तिरिक्त आणखी ऑफर्स लागू आहेत, चला एक-एक करून पाहूया…

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही 31 जानेवारी 2024 पर्यंत कोणत्याही प्रक्रिया शुल्काशिवाय वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. लग्न, अचानक आणीबाणी किंवा नियोजित खरेदीच्या बाबतीत वैयक्तिक कर्ज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. हे वैयक्तिक कर्ज तुम्ही SBI कडून 20 लाख रुपयांपर्यंत घेऊ शकता.

कर्जावर आकर्षक ऑफर

SBI च्या या वैयक्तिक कर्जामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी तुमच्यावरील भार कमी करतात. अधिकृत वेबसाइटनुसार, तुमचे वैयक्तिक कर्ज फार कमी कागदपत्रांसह मंजूर केले जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्याज रोजच्या घटणाऱ्या शिल्लक रकमेवर लागू होईल. या कर्जासाठी अर्ज करताना कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाहीत. याशिवाय यात दुसरे कर्ज घेण्याचीही तरतूद आहे. तुम्हाला सुरक्षा किंवा हमीदाराची काळजी करण्याची गरज नाही.

SBI च्या मते, या ऑफर अंतर्गत तुम्ही किमान 24000 रुपये आणि जास्तीत जास्त 20 लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. फक्त हे लक्षात घ्या कर्ज घेण्यासाठी तुमच्या नोकरीला किमान एक वर्ष पूर्ण झाली पाहिजे आणि तुमचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपये असले पाहिजे. याशिवाय एसबीआयकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचे एसबीआयमध्ये पगार खाते असणे आवश्यक नाही. तुमचे वय 21-58 वर्षांच्या दरम्यान असल्यास तुम्ही या कर्जासाठी (SBI वैयक्तिक कर्ज) अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे 

SBI कडून पर्सनल लोन घेण्यासाठी तुमच्याकडे ITR, 6 महिन्यांची सॅलरी स्लिप, 2 पासपोर्ट साइज फोटो, आयडी प्रूफ, रहिवासी पुरावा तयार असायला हवा. वैयक्तिक कर्जाची परतफेड किमान 6 महिन्यांत आणि कमाल 72 महिन्यांत करता येते.