आर्थिक

एसबीआय बनवेल तुम्हाला श्रीमंत! कमी गुंतवणुकीत मिळेल करोडोंचा परतावा

Published by
Ratnakar Ashok Patil

SBI Matual Fund:- एसबीआय हा भारतातील सर्वात मोठा बँकिंग समूह असून जो फक्त कर्ज देण्यापुरताच मर्यादित नाही तर गुंतवणुकीच्या विविध योजना आणि फंड्सच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना श्रीमंत होण्याची संधी उपलब्ध करून देतो. एसबीआयचे म्युच्युअल फंड्स हे अशा गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहेत जे कमी जोखमीतून अधिक लाभ मिळवण्याचा विचार करत आहेत. या लेखात आपण एसबीआयच्या अशाच एका फंडबद्दल सविस्तर माहिती घेऊ ज्यामुळे तुम्ही भविष्यात आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकता.

एसबीआय फंड म्हणजे काय?

एसबीआय म्युच्युअल फंड हे भारतातील सर्वात विश्वासार्ह म्युच्युअल फंड प्रदाते आहे. हे फंड विविध प्रकारांमध्ये विभागलेले असतात, जसे इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड आणि इतर स्पेशल फंड्स. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही अल्प व दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकता.

एसबीआय म्युच्युअल फंड का खास आहे?

एसबीआयचा हा फंड गुंतवणूकदारांना कमी जोखमीसह जास्त परतावा मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या फंडाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील शेअर्स, सरकारी रोखे आणि बाजारातील इतर साधनांमध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमचे आर्थिक जोखमीचे प्रमाण कमी होऊन दीर्घकाळात मोठा परतावा मिळण्याची शक्यता वाढते.

1-इक्विटीमध्ये गुंतवणूक: या फंडात तुमच्या गुंतवणुकीचा मोठा भाग इक्विटीमध्ये म्हणजेच कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवला जातो. इक्विटी फंड्सचा परतावा तुलनेने जास्त असतो, पण ते दीर्घकालीन असते.

2-डेट फंड्सची सुरक्षितता: या फंडाचा एक भाग डेट फंड्समध्ये गुंतवला जातो. डेट फंड्स म्हणजे सरकारी बॉण्ड्स, कर्जरोखे यांसारखी कमी जोखीम असणारे गुंतवणूक पर्याय आहेत व यामुळे फंडाला स्थिरता मिळते आणि गुंतवणूकदारांना हमी उत्पन्न मिळते.

हायब्रिड फंड्सचे मजबूत पॉईंट कोणते?

हायब्रिड फंड्समधील गुंतवणूक इक्विटी आणि डेट फंड्सचा संतुलित उपयोग करून केली जाते. त्यामुळे जोखीम आणि परतावा यांचा समतोल राखला जातो.

एसबीआय फंड कसा निवडावा?

तुमच्यासाठी योग्य एसबीआय फंड निवडण्यासाठी काही महत्त्वाचे घटक पाहणे खूप गरजेचे आहे व ते खालील प्रमाणे आहेत….

1-तुमचे उद्दिष्ट: अल्पकालीन फायदेशीर गुंतवणूक हवी आहे का की दीर्घकालीन श्रीमंती निर्माण करायची आहे?

2-जोखीम स्वीकारण्याची क्षमता: तुम्ही जोखमीसाठी किती तयार आहात याचा विचारा अगोदर करावा.

3-गुंतवणुकीची कालावधी: तुम्हाला किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे? याचा विचार करणे खूप गरजेचे आहे व त्यानुसार प्लॅनिंग करावी.

एसबीआय फंडमधील गुंतवणुकीचे फायदे कोणते?

1-तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक: एसबीआय म्युच्युअल फंड तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापित केला जातो. यामुळे गुंतवणूकदाराला जोखीम कमी आणि परतावा जास्त मिळतो.

2-कर सवलतीचा लाभ: काही विशेष फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकरामध्ये सूट मिळू शकते.

3-नियमित परतावा: एसबीआय फंड्समधील काही योजनांमध्ये तुम्हाला नियमित लाभांश मिळतो.

4-ऑनलाइन सोयीस्कर गुंतवणूक: तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने सहजपणे गुंतवणूक करू शकता आणि आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊ शकता.

एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये कशी कराल गुंतवणूक?

एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा जवळच्या एसबीआय शाखेत जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात.SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एक उत्तम पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही लहान रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

Ratnakar Ashok Patil