Categories: आर्थिक

ऑनलाईन पेमेंट करताना QR Code स्कॅन करता ? ‘अशा’ QR Code पासून राहा सावधान अन्यथा होईल ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- सायबर क्राइमची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. अलिकडच्या काळात सायबर फसवणुकीचे नवे अनेक प्रकरण समोर येत आहेत. सायबर ठग लोकांना फसवणूकीसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.

त्यांच्या दुर्लक्षामुळे लोक फसवणूकीचे बळी ठरतात असे बर्‍याचदा पाहिले गेले आहे. उदाहरणार्थ, ग्राहकांना बँकेत नोंदणीकृत केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून फसवणूक केली जाते.

असा एक मार्ग म्हणजे क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. याद्वारे एका क्षणात खात्यातुन आपली सगळी रक्कम काढून घेतली जाऊ शकते.

सुरक्षेच्या क्षेत्रात जनजागृती करण्यासाठी असणाऱ्या सरकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सायबर फ्रेंडने एका ट्वीटद्वारे अज्ञात स्रोताकडून प्राप्त झालेल्या अशा क्यूआर कोडबाबत सतर्क राहण्याची माहिती दिली आहे.

अशी क्यूआर कोड सायबर ठग वापरुन आपली फसवणूक करतात. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की ‘अज्ञात स्रोताकडून मिळालेला क्यूआर कोड स्कॅन करु नका. यामुळे आपल्या खात्यातून अनधिकृत पैसे काढले जाऊ शकतात.

”खरं तर अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यात लोकांना मेसेजद्वारे बनावट क्यूआर कोड पाठवून फसवणूकीस बळी पाडले जाते. यासह, संगणकावर एक संदेश पाठविला जातो, ज्यामध्ये असे सांगितले जाते की, आपल्याला खूप मोठा नफा मिळाला आहे.

जेव्हा सायबर ठगांकडून पाठविलेला हा कोड स्कॅन केला जातो, तर त्वरित खात्यातून पैसे काढले जातात. सायबर फ्रेंडने नुकत्याच केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये बायोमेट्रिक माहिती अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. संशयास्पद आणि अनधिकृत साइटवर कधीही फिंगर प्रिंट किंवा डोळयातील रेटिना स्कॅन देऊ नका.

अहमदनगर लाईव्ह 24