आर्थिक

शालेय सहली ठरताहेत ‘एसटी’ ला लाभदायी ! हिवाळ्यातील भ्रमंतीला शाळांचे प्राधान्य, एसटीच्या उत्पन्नात वाढ

Published by
Sushant Kulkarni

१५ जानेवारी २०२५ सुपा : या सहलींमुळे पर्यटन स्थळावरील आर्थिक उत्पन्न वाढी बरोबरच एसटीचे उत्पन्नही वाढत आहे.गुलाबी थंडीमुळे सध्या सर्वत्र अल्हाद दायक वातावरण असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत.तसेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत शालेय सहली काढल्या जातात.हा शैक्षणिक उपक्रमाचा भाग आहे.

शाळांमधून शालेय सहलीसाठी खासगी बसेस वापरल्या जात होत्या, मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक स्थितीत होत होता.आतानियमानुसार सर्वच शाळांनी सहलींसाठी एसटी बसला पसंती दिल्याचे दिसते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच कमी दरामध्ये प्रवासाची सोय उपलब्ध होत आहे.

तसेच एसटीच्या उत्पन्नामध्येही वाढ होत आहे.एसटीने सहलींसाठी जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.शिवनेरी, मुंबई, दौलताबाद, प्रतापगड, रायगड, रत्नागीरी, शिर्डी, शेगाव, अजिंठा, वेरूळ, लोणावळा, मुरुड, जंजिरा, हरे हरेश्वर आदि ठिकाणी सहली नेल्या जात आहेत, यात समुद्रकिनारे, गडकोट किल्ल्यांकडे सहल नेण्यास शाळांची पसंती आहे.

सहलीमध्ये पर्यटनासह ज्ञान दानाकडे शाळांचे लक्ष आहे.ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे, कारखाने अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जात आहेत, त्याचबरोबर आता वॉटर पार्क, थीम पार्क अशा ठिकाणी ही सहली जात आहेत.

सहलींचा हा ट्रेड पर्यटन वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे.येथील व्यवसायिकांची आर्थिक उलाढाल वाढली आहे.समुद्रकिनारे, उंच शिखरे अशा धोकादायक ठिकाणी सहली काढताना खबरदारी घ्यावी.पालकांच्या संमतीनेच मुलांना सहलीला न्यावे.सहलीसाठी एसटी बसेसचा वापर करावा.मुलांचे संरक्षण व आरोग्याची जबाबदारी घ्यावी,अशी नियमावली जारी करण्यात आली आहे.

दसरा, दिवाळी झाल्यानंतर थंडीची चाहूल लागते.याच दरम्यान बहुतांश शालेय सहलींचे ही आयोजन शाळांकडून सुरु होते.त्यामुळे शालेय विद्यार्थी सहलीची आतुरतेने वाट पाहतात.सद्य स्थितीत काही ठिकाणी चांगले रस्ते व कमी दरात एसटी बसेस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याच्या सहलींना प्राधान्य दिले जात आहे,त्यामुळे सर्वच पर्यटन स्थळांवर शालेय विद्यार्थ्यांचा वावर दिसून येत आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni