Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी, ‘या’ 3 सरकारी बँका देतायेत बंपर व्याज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Senior Citizen : FD मध्ये गुंतवणूक करणे सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या सध्या सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत.

बाजारातील अनेक बँका त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर जास्त व्याजदर देत आहेत. या यादीत बँक ऑफ बडोदा, अ‍ॅक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँकेची नावे आहेत. आजच्या या बातमीत आपण फक्त FD वरील व्याजदर पाहणार नाही तर एकूण रकमेबद्दलही जाणून घेणार आहोत.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाआपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर उच्च व्याजदर ऑफर करत आहे. बँक तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के दराने व्याज देते. तुम्ही तीन वर्षांसाठी यात एक लाखाची गुंतवणूक केल्यास ही रक्कम मॅच्युरिटी कालावधीत 1,25,895 होईल.

अ‍ॅक्सिस बँक

अ‍ॅक्सिस बँक देखील त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना जास्त व्याजदर देते. तीन वर्षांच्या FD साठी अबनक 7.60 टक्के दराने व्याज देत आहे.

याचा अर्थ, जर तुम्ही तीन वर्षांसाठी येथे एकूण एक लाखाची गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटी ही एफडी 1,25,340 होईल.

पंजाब नॅशनल बँक

तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँक FD व्याजदराचा पर्याय घेऊ शकता. PNB तीन वर्षांच्या FD साठी 7.50 टक्के दराने व्याज देत आहे.

याचा अर्थ, तुम्ही तीन वर्षांसाठी एक लाखाची गुंतवणूक केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1,24,972 रुपये इतकी रक्कम मिळेल.