Senior Citizens Fixed Deposit : वृद्धांसाठी चांगली बातमी! 4 बँका गुंतवणुकीवर देणार बंपर परतावा, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Senior Citizens Fixed Deposit : बँका किंवा पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेव योजना कमी जोखीम देणाऱ्या असतात त्यामुळे अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात. अनेकजण आता गुंतवणुकीसाठी स्टॉक आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या मार्गांकडे पाहतात.

तर विशेषत: ज्येष्ठ वयोगटातील, कोणत्याही आर्थिक जोखमीशिवाय हमी परतावा देणार्‍या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. फिक्स्ड डिपॉझिट हे मागील दशकांपासून सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक राहिले आहेत.

बँकांच्या वतीने आता वृद्धांना विशेष एफडीची सुविधा देण्यात येत आहे. हे लक्षात घ्या की या योजना कोरोनाच्या काळात सुरू झाल्या होत्या. परंतु त्यामध्ये आता अनेक बँकांकडून एफडीच्या शेवटच्या तारखेत सुधारणा करण्यात आली आहे.

IDBI बँक एफडी

ज्येष्ठ नागरिकांसाठी या तीन विशेष एफडी योजनांशिवाय IDBI बँकेकडून मर्यादित कालावधीची FD योजना सुरू करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे IDBI ची अमृत महोत्सव FD फक्त 375 दिवस आणि 444 दिवसांसाठी आहे. आता तुम्हाला या योजनेत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

एचडीएफसी बँक एफडी

HDFC बँक आपल्या ग्राहकांना 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत FD मिळवण्याची सुविधा दिली जात आहे. इतकेच नाही तर यात तुम्हाला जास्तीत जास्त व्याजाचा लाभ मिळेल. तुम्हाला 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत HDFC बँकेच्या या योजनेत गुंतवणूक करता येते.

आयसीआयसीआय बँक एफडी

तसेच ICICI बँक आपल्या ग्राहकांना 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत FD ची सुविधा दिली जात आहे. आता तुम्हीही गोल्डन इयर्स एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. तुम्हाला 31 ऑक्टोबरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.

SBI बँक एफडी

हे समजून घ्या की SBI कडून SBI Wecare एफडीची सुविधा ग्राहकांना देण्यात येत आहे. यात गुंतवणूकदार 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मुदत ठेवी करू शकतात. या एफडी योजनेत, गुंतवणूकदारांना 50 bps पेक्षा जास्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदत ठेव करता येईल. त्यावर 7.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे.