आर्थिक

SBI Fixed Deposit Schemes : ज्येष्ठ नागरिकांची मज्जा..! SBI देतेय पैसे डबल करण्याची संधी…

Published by
Ahmednagarlive24 Office

SBI Fixed Deposit Schemes : जर तुम्ही जोखीममुक्त आणि उच्च परतावा देणारी गुंतवणूक शोधत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे, आज माही तुम्हाला अशीच एक गुंतवणूक योजना सांगणार आहोत, जी सुरक्षित आणि जास्त परतावा देणारी आहे. आम्ही SBIच्या एका खास योजनेबद्दल बोलत आहोत, जी तुम्हाला उच्च परताव्यासह सुरक्षेची देखील हमी देते.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI अशी एक खास योजना ऑफर करत आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करू शकता. तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला थेट मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळतील. SBI ने अलीकडेच WeCare FD योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. SBI त्यांच्या WeCare FD वर ग्राहकांना सर्वोत्तम व्याज देत आहे. SBI च्या या खास FD योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

SBI WeCare FD व्याज दर

बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 अधिक व्याज देते. SBI Wecare वर जेष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळत आहे. योजनेअंतर्गत गुंतवणूक किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी केली जाते.

सध्या, SBI बँक आपल्या ग्राहकांना WeCare FD वर ७.५ टक्के व्याज देत आहे. अशास्थितीत येथे केलेली गुंतवणूक 10 वर्षांत दुप्पट होईल. म्हणजेच, जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 10 लाख रुपये मिळतील. 5 लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 10 वर्षात 5.5 लाख रुपये व्याज म्हणून मिळतील. बँक नियमित एफडीवर 10 वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे. SBI त्यांच्या FD वर 3.50 टक्के ते 7.60 टक्के व्याज देते आहे.

एसबीआय वेकेअर एफडी योजना

तुम्ही SBI च्या WeCare स्पेशल FD स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.५ टक्के दराने व्याज मिळते. SBI च्या या योजनेत ग्राहकांना नियमित FD पेक्षा 0.30 टक्के जास्त व्याज मिळते. जर तुम्ही या FD योजनेत सामील झालात तर तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळू शकते.

Ahmednagarlive24 Office