Share Market News:- दिवाळीचा कालावधी सुरू असून देशांतर्गत शेअर बाजाराने देशांतर्गत उत्तम अशी सुरुवात केलेली असून मुहूर्तांच्या व्यवहारांमध्ये बीएसई सेंसेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोनही निर्देशांक तेजीमध्ये राहिले होते. शेअर मार्केटचा विचार केला तर दिवाळी बाजारासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. कारण दिवाळीच्या दिवशी देशातील व्यापारी वर्ग संपत्तीची देवी म्हणून लक्ष्मीची पूजा करतात व या दृष्टिकोनातून शेअर बाजारासाठी देखील याचे महत्त्व वाढते.
कारण प्रत्येक वेळी दिवाळी ही बाजारात नवीन वर्षाची सुरुवात होते व विक्रम सवंत आणि संवंत 2080 नुसार बाजारपेठा आणि व्यावसायिकांचे हे नवीन वर्ष दिवाळीपासून सुरू झाले आहे. या संवतच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षात व्यापारी वर्ग जुन्या हिशोबाच्या वह्या देखील बदलतात. याच नोव्हेंबर महिन्यामध्ये आता देशातील प्रसिद्ध असलेल्या टाटा ग्रुपच्या टाटा टेकचा आयपीओ येणार असून बऱ्याच जणांची कित्येक दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे.
वीस वर्षानंतर येणार टाटाचा हा आयपीओ
याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी असून टाटा ग्रुपच्या आयपीओची आता प्रतीक्षा संपलेली असून वीस वर्षानंतर टाटा आयपीओ लाँच करण्यात येणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी हा आयपीओ 22 नोव्हेंबरला सबस्क्राईब साठी ओपन होणार असून 24 नोव्हेंबर पर्यंत त्याकरिता बोली लावता येणार आहे. हा आयपीओ ऑफर फॉर सेल अर्थात ओएफएस अंतर्गत येणार आहे.
म्हणजेच या आयपीओ मध्ये कोणत्याही नवीन इशू येणार नाही. यामध्ये तीन शेअर होल्डर्स आयपीओ मधील त्यांचे काही शेअर्स विकतील. या अगोदर विचार केला तर आयपीओ मध्ये 9.57 कोटी शेअर्स विकले जाणार होते. परंतु आता ते 6.08 कोटी रुपये करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ राहणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या आयपीओ बद्दल टाटा कडून अजून कुठल्याही प्रकारची प्राईज बँड माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
टाटा टेक्नॉलॉजीस कंपनी काय करते?
टाटा टेक्नॉलॉजी ही टाटा मोटर्सच्या मालकीची कंपनी असूनही ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चररला प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि डिजिटल सोलुशन पुरवण्याचे काम करते. या कंपनीच्या ग्राहकांमध्ये जग्वार, लँड रोव्हर आणि एअरबस एसई यासारख्या कंपन्यांचा समावेश असून जग्वार लँड रोव्हर ही टाटा समूहाचे कंपनी आहे.
या कंपनीची आर्थिक परिस्थिती
टाटा टेक्नॉलॉजीचा 2023 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर नफा आणि महसूल यामध्ये 2022 च्या तुलनेमध्ये किंचित घट आलेली होती. परंतु या कंपनीची जमेची बाजू म्हणजे या कंपनीवर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी एक पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. आर्थिक वर्ष 2023 चा विचार केला तर कंपनीचा महसूल 4418 कोटी रुपये होता तर नफा 700 कोटी रुपये होता.
हे तीन भागधारक विकणार शेअर्स
यामध्ये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून टाटा मोटर्स 46,275,000, अल्फा टीसी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड 9,71,853 आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 4,858,425 शेअर्स ऑफलोड करेल. तसेच या ऑफर फॉर सेल पैकी दहा टक्के टाटा टेक आणि टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव शेअर्स असणार आहेत.