Share Market News : तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण तज्ज्ञांकडून शेअर बाजारातील ३ शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तुम्हीही तज्ज्ञांकडून सुचवण्यात आलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याआगोदर तुमच्या शेअर बाजार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण शेअर बाजारात तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला परत मिळेल तसेच तुम्हाला तोटा देखील अधिक होण्याची शक्यता असते.
अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करताना पेनी स्टॉक निवडत असतात. कारण अशा स्टॉकची किंमत कमी असते त्यामुळे गुंतवणूकदार अशा स्टॉककडे आकर्षित होत असतात. मात्र पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे.
जर तुम्हीही पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमावत असलेल्या कमीत कमी रकमेचा भाग अशा स्टॉक्समध्ये गुंतवा. जेणेकरून जर तुम्हाला अशा स्टॉकमध्ये तोटा झाला तर फारसे नुकसान होणार नाही.
शेअर बाजार तज्ज्ञांकडून काही स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला बंपर नफा मिळवून देऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच ३ स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
1. Max Healthcare Institute Ltd
तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेला Max Healthcare Institute Ltd हा शेअर येत्या काळात चांगला नफा देऊ शकतो. हा शेअर सध्या 556 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. तसेच या शेअरसाठी तज्ज्ञांनी 630 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
2. GAIL (India) Ltd
शेअर बाजारातील GAIL (India) Ltd चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या कंपनीचे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना मालामाल करतील असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. या कंपनीचा शेअर्स सध्या 116 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.
3. Hero MotoCorp Ltd
तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे तर तज्ज्ञांकडून Hero MotoCorp Ltd चे शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात असा दावा देखील करण्यात आला आहे. Hero MotoCorp Ltd हा शेअर्स सध्या 2,952 ट्रेडिंग करत आहे.