Share Market News : शेअर मार्केटमध्ये सध्या चांगलाच चढ उतार पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटमध्ये अनेकजण मोठी गुंतवणूक करत असतात तर काही जण छोटी गुंतवणूक करतात. तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये बक्कळ पैसे कमवायचे असतील तर तज्ज्ञांनी काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
या आठवड्यात इक्विनॉक्स रिसर्चचे पंकज रंदर यांनी काही निवडक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करा.
शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. 3 शेअर्स गुंतवणूकदारना या आठवड्यात चांगली कमाई करून देऊ शकतात. कोणता शेअर्स कधी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे ते जाणून घ्या.
EQUINOX रिसर्चच्या पंकज रंदर यांनी खालील शेअर्सवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे.
GMR शेअर्स
पंकज रंदर यांनी GMR शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा शेअर 86 रुपयांवर आहे तर या शेअर्ससाठी 105 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. तसेच 80 रुपयांवर स्टॉपलॉस देण्यात आला आहे.
M&M फायनान्शियल शेअर्स
M&M फायनान्शियल शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला पंकज रंदर यांनी दिला आहे. सध्या हा शेअर 274 रुपयांवर आहे. या शेअर्ससाठी 260 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. या शेअर्ससाठी 280 वर स्टॉपलॉस देण्यात आला आहे.
Jubilant Food शेअर्स
पंकज रंदर यांनी Jubilant Food चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा शेअर्स 542 रुपयांवर आहे. या शेअर्ससाठी 480 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. तसेच 565 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.
तुम्हीही या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचाच विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच यामध्ये गुंतवणूक करा. शेअर मार्केटमध्ये पैसे मिळण्याची जितकी संधी आहे तितकीच जोखीम देखील आहे.