Share Market Update:- शेअर बाजाराने काल म्हणजेच ४ डिसेंबर रोजी एक नवीन विक्रमी पातळी गाठली असून सेन्सेक्सने प्रथमच 68 हजारांची पातळी ओलांडली होती. 954 अंकांच्या वाढीसह 68 हजार 435 च्या पातळीवर उघडला. अगदी सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये शेअर बाजारातील जे सर्व तीस शेअर्स आहेत ते वाढताना दिसत होते.
तसेच निफ्टीने देखील काल 20500 ची पातळी ओलांडली आहे. निफ्टी 329 अंकांच्या वाढीसह 20601 च्या पातळीवर उघडला. जर आपण बाजारातील आलेल्या या मजबुतीची कारणांचा शोध घेतला तर प्रामुख्याने देशातील पाच पैकी तीन राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत त्यासोबतच दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 7.60 टक्क्यांवर पोहोचला.
याबाबतीत रिझर्व बँक ऑफ इंडियाचा अंदाज हा 6.5 टक्क्यांचा होता व त्या अंदाजापेक्षा जीडीपीमध्ये 1.1 टक्क्यांची जास्त वाढ झाली. तिसरे कारण म्हणजे शुक्रवारी अमेरिकन बाजाराने देखील जोरदार मुसंडी घेत उच्चांकी पातळीवर बंद झाला व आशियाई बाजार देखील तेजीत असल्याचा हा परिणाम आहे.
या बाजारातील तेजीचा परिणाम काही कंपन्यांच्या शेअरवर पाहायला मिळत आहे. यामध्ये काही शेअर्सनी एका दिवसामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 20 टक्क्यांचा परतावा मिळवून दिलेला आहे. त्यामुळे शुक्रवारच्या झालेल्या ट्रेडिंगमध्ये कोणत्या कंपन्यांच्या शेअर्स ने 20% वाढीसह ट्रेड केले त्यांची माहिती घेणार आहोत.
या शेअर्समध्ये झाली 20% वाढ
1-SecUR क्रेडेन्शियल्स– जर आपण मागच्या आठवड्याचा विचार केला तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्समध्ये तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाली. या वाढीसह या कंपनीचा शेअर्स 23.19 वर ट्रेड करत होता. काल म्हणजे चार डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.67% घसरणीसह 21.70 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
2- भारतीय इंटरनॅशनल लिमिटेड– मागील आठवड्याच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील 20 टक्के वाढ होऊन तो 286.65 किमतीवर ट्रेड करत होता. तर काल म्हणजे चार डिसेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स मध्ये 19.99 टक्क्यांची वाढ होऊन तो 341.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
3- चेन्नई
मीनाक्षी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लिमिटेड– या कंपनीचे शेअर्स मागच्या आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 37.96 किमतींवर ट्रेड करत होते तर काल म्हणजे चार डिसेंबर रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 19.99 टक्क्यांची वाढ झाली व तो 45.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.4-Tanfac India- शुक्रवारचे ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीचे शेअर्समध्ये देखील 20 टक्क्यांची वाढ झाली तो 2674 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल चार डिसेंबर रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र 4.08 टक्क्यांची घसरण झाली व तो 2565.50 किमतीवर ट्रेड करत होता.
5- पीसीएस टेक्नॉलॉजी– मागच्या आठवड्याच्या शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये पीसीएस टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये देखील 20% वाढ झाली होती व तो 17.98 किमतीवर ट्रेड करत होता. तर काल म्हणजेच चार डिसेंबर रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा 19.97% ची वाढ होत तो 21.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.